Savadhan's Blog


—— home ! घर असावे घरासारखे !

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 07/07/2010
Tags: , , , , ,

—— home ! घर असावे घरासारखे !

पुण्यात असतो तेव्हा एकदोन महिन्यानी शिवथरघळ येथे जाणं होतं. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची संकल्पना राबवणारे सुधाकरशेठ, त्यांना मनापासून साथ देणारे त्यांचे मित्रवर्य स्मॅश इलेक्ट्रिकल्सचे संचालक चितळे,अरिहन्त इलेक्ट्रिकल्सचे संचालक ओसवाल अशी मोजकीच मंडळी बरोबर असतात. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठानची संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यासाठी महाड जवळील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मोलाची मदत होत आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने तेथे वारंवार जाणं घडतं. या कामात त्यांना आमची काही मदत हवी असेल तर ती देण्यात येते ,काही अडचणी असतील तर त्यांचं निवारण करण्यात येते. हे काम झालं कि आमचा मोर्चा आपोआप शिवथरघळकडे समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वळतो.

विवारी शिवथरघळला जायला कधी जमत नाही.बहुतेक तो वार शनिवार किंवा सोमवार असाच असतो.या दिवशी घळीत फारशी गर्दी कधी जाणवली नाही. त्यामुळे अगदी निवांतपणे घळीचं दर्शन घेणं जमतं. मन कसं प्रसन्न होतं तिथल्या शांत शांत आणि थंडगार वातावरणामुळे. समर्थांनी तिनसाडेतिनशे वर्षापुर्वी या घळीत बसून दासबोधाचे लेखन केले.कसं केलं असेल हे सर्व ? दिव्याची व्यवस्था काय केली असावी ? त्याकाळी या जागी निबिड अरण्य असावे,वन्य पशुपक्षी यांचा वावर असावा. त्यांचा बंदोबस्त कसा केला असावा? असे अनेक प्रश्न मनात येतात.

सोळाशेसाठ प्रश्नांचं ओझं मनात घेऊन मी अनेकदा तेथे गेलो, आणि मग दरवेळी घळीत समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन झाल्यावर जवळच असलेल्या मोठ्या सभाग्रहात जाऊन तेथे लावलेल्या फलकांचे मन लावून वाचन करु लागलो. हे असं नेहमीच घडत असे. इतकं प्रभावी असे त्या फलकावर काय आहे ? अस मनात येणं स्वाभाविक आहे.

न,मन एक करून ,अत्यंत एकाग्रचित्ताने मी दरवेळी त्या फलकावरील उपदेशरुपी लेखांचं वाचन करत असतो. त्यापैकी एक असतं ”घर असावे घरासारखे —-” या कवितेचं. पुण्याच्या विमल लिमये यांची ही कविता. मध्यंतरी ही कविता मी माझ्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना विरोपाने पाठवून दिली.या कवितेचा समावेश सुधाकरशेठ यांनी ”संस्कारधन” या पुस्तकात केला आहे.ते ही पुस्तके प्राथमिक,माध्यमिक शाळेतील मुलांना मोफत वाटत आहेत. अनायासे मुलांना आणि त्यांच्याबरोबर मोठ्यांनाही  “घर कसे असावे—“ याचा पाठ या संस्कारधनाच्या माध्यमातून मिळत आहे. या घरात नुसत्या भिंती नकोत तर तेथे जिव्हाळा,प्रेम सांभाळणारी नाती हवीत. अर्थपूर्ण बोलणं हवं. या घरात सुरेल गाणी असावीत, नुसती खुळखुळणारी नाणी नकोत तर त्याना स्वकष्टाचा,सदाचराचा सुगंध असावा, डोळ्यातून येणारे अश्रू हे नुसते नक्राश्रू नसावेत तर त्या अश्रूत खरीखुरी प्रीत असावी,जिव्हाळा असावा आणि या घरातून बाहेर पडणारे पिल्लु दिव्य शक्तियुक्त अशा स्वबळाने या जगात भरारी घेणारे असावं,घराचे नांव उज्ज्वल करणारं असावं,हरिभक्तपरायण असावं असं मोजकं मनोगत व्यक्त करणारी ही कविता मनाचा ठाव घेते. प्रत्येकाने आपल्या घरातील भिंतीवर आवर्जुन लावावी अशी ही संस्कारक्षम पवित्र कविता !

नाचे श्लोक अनेकदा वाचावेत,अनुभवावेत असेच आहेत. कसलाही संभ्रम असेल तर खुशाल मनाचे श्लोक वाचू लागा, मन शांत होईल. किंवा अजून काही अध्यात्मिक वाचन करा, मन आपोआप शांत होईल.
अगदी असाच संदेश देणारी “घरात काय असावे? “ ही दुसरी कविता येथे फलकावर झळकत आहे. या कवितेचा समावेशही [Arvind Nerkar’s]“संस्कारधन” या पुस्तकात सुधाकरशेठ यानी केला आहे. ही कविता कोणी लिहिली आहे त्यांचा उल्लेख येथे केलेला नाही. गेली अनेक वर्ष मी ती शिवथरघळ येथे पाहतोय.ही संपूर्ण कविता मी आपल्या माहितीसाठी देत आहे.
केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये
आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये॥धृ॥
येणार्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी
जाणार्याच्या मनात फिरुनी, येण्याविषयी ओढ हवी
ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये॥१॥
लहान मोठी भांडी सारी, फिरत असती घरामध्ये
भांड्याला लागतेच भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये
परस्परांना समजून घ्यावे, अढी नसावी मनामध्ये॥२॥
नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या व्यक्तींची
ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची
एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये॥३॥
लळा, जिव्हाळा आत असावा,नको उमाळा वरकरणी
नको कुणाला गर्व धनाचा,लीन रहावे प्रभुचरणी
दिवसा रात्री परमेशाचा ध्यास असावा घरामध्ये ॥४॥
मनाचे श्लोक पुढील दुव्यावरपण ऐकू शकाल. http://www.dhingana.com/search?q=manache+shlok&searchtype=album

Advertisements
—— home ! घर असावे घरासारखे ! वर टिप्पण्या बंद

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा .

Posted in मराठीप्रेमी,social by savadhan on 14/05/2010
Tags: , ,

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा –महत्वाचे मुद्दे
अमेरिकन महिलांना जवळ जवळ दोनशे वर्षाच्या लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि हक्क याची माहिती येथे दिली आहे. शंभर वर्षापूर्वी महिलांवर अनेक बंधने होती त्या मानाने आज रोजी अमेरिकन महिलांना कल्पनातीत अशा अनेक हक्काच्या संधींचा आणि स्वातंत्र्याचा लाभ झाला आहे. त्याचा फायदा जगातील इतर राष्ट्रातील महिलांना पण झाला.अमेरिकन महिलांना काय आणि कुठल्या प्रकारचे हक्क मिळाले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे असे मला वाटते. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी ERAवाचावे .एलिस पॉल नावाच्या कायदेतज्ञ असलेल्या महिला संघटनेच्या नेत्याने पहिल्यांदा १९२३ साली ERA चा मसूदा लिहून तो कॉंग्रेस समोर विचारासाठी सादर केला.शेवटी २२मार्च १९७२ ला सिनेटसह प्रतिनिधीगृहाची २/३ बहुमताने मंजूरी मिळाली आणि हा मसूदा इतर राज्यांच्या मंजूरीसाठी पाठवून देण्यात आला.यासाठी सात वर्षाची दिलेली मुदत ३०जून १९८२ पर्यंत वाढवून दिली तेव्हा घटनेनुसार ३/४ म्हणजे ३८ राज्यांऐवजी ३५ च राज्यांनी या मसूद्यास मंजूरी दिलेली असल्याने याचा समावेश अद्याप अमेरिकेच्या घटनेत झालेला नाही. या ERA ने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विषमलिंगी विवाहाप्रमाणेच समलिंगी विवाहास कायद्याने संमती, अविवाहित महिलेस हवे असल्यास कायद्याने अपत्य प्राप्तीचा हक्क इ.इ.१९८२ पासून कॉंग्रेसच्या प्रत्येक सभेसमोर ERA पुन:विचारार्थ ठेवण्यात आले.२००७-०८ च्या ११० व्या सभेनंतर आता २००९-१० च्या १११व्या सभेसमोर ते पुनः विचार विनिमयासाठी येण्याची अपेक्षा आहे. खाली एकेका मुद्यावर संक्षिप्त टिपणी देत आहे.
१] ४ जून १९१९ ला अमेरिकन कॉंग्रेसने १९ व्या राज्यघटना दुरूस्तीने अमेरिकन महिलांना मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला.
{भारतीय महिलांना सुद्धा आजरोजी मतदानाचा हक्क आहे. मात्र भारतातील महिलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ५०% असूनही संसदेत तेवढे प्रतिनिधीत्व तर सोडाच पण ३३% [ हा आकडा कुठून आणला ते मला ठाऊक नाही ] प्रतिनिधीत्व देण्यातही अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत.} अमेरिकेतील महिलांना संसदेत किती टक्के प्रतिनिधीत्वाचा हक्क आहे ते येथे नमूद केलेले नाही.
२] अमेरिकन महिलांना पुरूषांच्या बरोबरीने म्हणजे पुरुषांइतकेच वेतन घेण्याचा हक्क कायद्याने दिला आहे.लिंगावर आधारीत वेतनात भेदभावास आता प्रतिबंध करण्यात आला आहे. १९३८ च्या फ़ेअर लेबर स्टॅंडर्ड ऍक्ट ने स्त्री-पुरुषांना किमान वेतनाची हमी दिली आहे. आणि म्हणूनच इक्वल राईट्स अमेंडमेंट्स ला स्री-पुरुष समानता दाखवण्यासाठी Women’s Equality Amendment असंही म्हंटलं जातं.
[भारतात समान काम समान वेतन कायदा आहे. तसेच भारतीय महिलांना आयकरातही विशेष सवलत मिळत आहे. ]
३] जे काम पुरुष करतात ते काम करण्याचा हक्क १९६४ च्या सिविल राईट्स् ऍक्ट ने अमेरिकन महिलांना मिळालेला आहे. तसेच नोकरभरतीसाठी लिंगाधारीत जाहिराती देणे बेकायदेशीर समजण्यात येत आहे.
[ भारतातही कोणत्याही नोकरीसाठी स्त्रियांना अपात्र समजण्यात येत नाही किंवा नाकारण्यात येत नाही.बस चालक,बसवाहक,रिक्षाचालक,पोस्टवुमन,अभियंता,इ. अशा विविध सेवासाठी स्त्रियांची निवड होत आहे. ]
४] महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा हक्क अमेरीकन महिलांना मिळाला आहे. १८७० मध्ये अमेरिकेत एकूण संख्येच्या २० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या आज रोजी त्यांची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.
[ भारतात ही महाविद्यालयीन मुलींची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते,गेल्या दोन दशकांत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येते.]
५] विवाहोत्तर धर्म निवडीचे स्वातंत्र्य अमेरीकन महिलांना मिळाले आहे. पूर्वी ज्या पुरूषाबरोबर विवाह होई त्या पुरुषाचा जो धर्म असेल तोच धर्म त्या महिलेस निर्विवादपणे आपोआप स्वीकारावा लागे.
[ भारतीय महिलांना ही मुभा आहे.आंतरधर्मीय विवाहानंतर पुरुषाचा जो धर्म असेल त्या धर्माच्या चालीरीतीशी त्या विवाहित महिलेस समन्वय साधणे भाग पडते असे प्रत्यक्ष अनुभवास येते.]
६] स्वतःची स्थावर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार अमेरीकन महिलांना कायद्याने मिळालेला आहे. इ.स.१८०० च्या दरम्यान पतिच्या परवानगीशिवाय अशी मालमत्ता धारण करता येत नसे.
[ भारतात महिलांना कायद्याने वारसाहक्काने स्थावर मालमत्तेत योग्य हिस्सा मिळण्य़ाचा अधिकार मिळाला आहे.तसेच स्वकष्टाने मालमत्ता धारण करण्याचाही हक्क आहे.]
७] १९७८ च्या प्रेग्नंसी डिस्क्रिमिनेशन ऍक्ट नुसार गरोदर असलेल्या किंवा गर्भसंभव असलेल्या अमेरिकन महिलांना नोकरीतील बढतीची संधी नाकारण्यास किंवा नोकरी नाकारण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गरॊदर स्त्रियांनी गरोदरपणात सक्षमपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना गरोदरपणाच्या रजेची सक्ती करता येणार नाही.सद्या अमेरिकेत तीन महिने पगारी प्रसुती रजा मिळते.
[भारतातील महिलांना सुद्धा ह्या सवलतींचा फायदा मिळत आहे.अभियांत्रिकी,वैद्यकीय,सेनादले,प्रशासकीय सेवा,शिक्षणसंस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय महिला सक्षमपणे कार्यरत आहेत.]
८] अवांछित संतती होऊ द्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेणाचा हक्क अमेरिकन महिलांना आहे.त्यासाठी आवश्यक असणार्या गर्भनिरोधक गोळ्या, औषधे घेण्याचा, गर्भपाताचा निर्णय घेण्याचा हक्क त्याना आहे.
[ भारतात आजही कायद्याने हे सर्व हक्क भारतीय महिलांना आहेत परंतु सामाजिक आणि कौटुम्बिक दबावाखाली भारतीय स्त्रिया याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत असे अनुभवास येते.आजही असंस्कृत कुटुंबात संततीबाबतचे सर्व निर्णय कुटुंबातील इतर लोकच घेतात, त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्येचे अनेक प्रकार राजरोसपणे घडतात.आता याविषयी कायद्याची बंधने कठोरपणे पाळण्यात येत आहेत.त्यामुळे अशा प्रकारास थोडाफार आळा बसला आहे असे वाटते. ]
९] इच्छा नसेल तर आपल्या पतीबरोबर समागमास नकार देण्याचा हक्क अमेरिकन महिलेस १९७६ नंतर मिळाला.तत्पुर्वी अशा प्रकारचा हक्क त्यांना नव्हता. आजारपणासारख्या काही कारणाने इच्छा नसल्यास समागमाची जबरदस्ती अमेरिकन महिलांवर होत असावी असे वाटते.आता अशा समागमास [ज्यास rape हा शब्द योजला आहे]या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आला असून अमेरिकन महिलांना या कायद्याने संरक्षण दिले आहे.
[भारतातील सुसंस्कृत एकत्र कुटुंबात महिलांना अनेक धार्मिक बंधनाचं पालन करावं लागत असे तसंच ते पुरुषांनाही करावे लागत असे. त्यामुळे अनैच्छिक समागमाचा प्रसंग येत नसे. समागम हा विधीवत आनंदाने करावयाचे आचरण असून तसे संस्कार उभयतांवर झालेले असत.
आता सामाजिक परिस्थिती खूपच बदललेली आहे.आर्थिक,धार्मिक वा अन्य कौटुंबिक कारणामुळे [विभक्त] कुटुंबातील पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्यास कुटुंबकलहास सुरुवात होते.अशावेळी पत्निची इच्छा नसताना पतीने समागमाची इच्छा व्यक्त केल्यास तिला त्या लैंगिक संबंधास कायद्याने नकार देण्याचा अधिकार असेल मात्र त्यामुळे कलह वाढत जाऊन त्याची परीणती विवाहविच्छेदनात होण्याचीच शक्यता जास्त होईल. (पुर्वीच्या मानाने अलिकडे घटस्फोटाच्या संख्येत वाढ झालीआहे.)भारतीय दंडसंहितेमधील कलम ३७५ पतीपत्नीच्या संबंधास लागू होईल का किंवा त्यासाठी वेगळी अशी तरतूद आहे काय ते पहावे लागेल. जिज्ञासूनी बलात्कार याविषयी लिहिलेला लेख अवश्य पहावा. या ठिकाणी याविषयी तपशीलवार चर्चा अपेक्षित नाही.]

Kiberia Yethe mahilanchi kay avastha aahe te paha .

http://www.amnesty.org/en/news-and-updates/video-and-audio/video-women-kibera-kenya-20090306

अमेरिकन महिलांचा हक्कासाठीचा लढा . वर टिप्पण्या बंद

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का?

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का?
आज रोजच्या प्रमाणे विरोप पहात होतो त्यात एका विरोपाने विचार करायला भाग पाडलं. हा विरोप जरा वेगळ्याच विषयावर होता. त्याचं नाव होतं इंडिया गरीब आहे कां ? अशा अर्थाचं . पण संदर्भ होता स्विस बॅंकेतील पैशाचा. त्यात विरोप लिहिणारा लिहितो की जर ऑलिंपिकमध्ये काळा पैशाच्या ठेवीची स्पर्धा असती तर भारताने हातोहात सुवर्ण पदक जिंकलं असतं, आणि दुसर्या क्रमांकावर रशिया आला असता.
हे वाचून कोणाचंही डोकं गरगरायला लागलं असतं. अशीच या विरोपातील माहिती आहे. पण सामान्य माणूस काय करू शकतो. तरीसुद्धा ही माहिती सर्वसामान्यापर्यंत पोचवली पाहिजे असं मला वाटलं.
आंतर्राष्ट्रीय दबावामुळे स्विस सरकारने , संबंधीत ठेवीदाराच्या देशाने मागणी केली तर त्यांची नावे जाहीर करण्याचे नुकतेच मान्य केले आहे. असं असूनही भारत सरकार मात्र अशा ठेवीदारांचा तपशील का विचारत नाही हा एक गहन प्रश्न आहे. स्विस बँकेतील इतर सर्व देशांच्या काळ्या पैशाच्या ठेवीच्या एकूण बेरजेपेक्षा जास्त इतका काळा पैसा ठेवीच्या रुपाने स्विस बँकेत आहे. असं जर असेल तर आपण भारताचे नागरीक या नात्यांने या संबंधात काय करू शकतो ते तपासणे आवश्यक आहे.
सदर विरोपात पुढे म्हंटले आहे की सरकारवर दबाव येण्यासाठी भारतीय नागरीकांनी एक चळवळ उभारली पाहिजे,आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी मिळालेल्या या सुवर्णसंधीचा फायदा घेतला पाहिजे.
वाचकांनो हे वाचा , आणि जास्तीत जास्त भारतीयांना याविषयी माहिती द्या. याविरोधात एक जबरदस्त चळवळ उभी करूया आणि सुस्त सरकारला कृतीसाठी जागे करूया.असं आवाहन ही पुढे तो करतोय.
भारत हा एक गरीब देश आहे असं कॊण म्हणतं ? या देशातले भ्रष्ट राजकारणी, भ्रष्टाचारी प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांनी परदेशी बँकांमधून, त्यांच्या बेकायदेशीर खात्यात जवळजवळ १५००बिलियन डॉलरची, अफरातफर केलेली रक्कम ठेवलेली आहे. ही रक्कम या देशाच्या परदेशाकडून घेतलेल्या कर्जाच्या १३ पटीपेक्षा जास्त आहे. हा काळा पैसा या चोरांनी भारतीय जनतेस लुटून आणि फसवून मिळवलेला आहे. जर हा प्रचंड काळा पैसा भारतात परत आला तर चोवीस तासात भारत कर्जमुक्त तर होईलच पण घेतलेल्या कर्जाच्या १२ पट रक्कम शिल्लक राहील असा तज्ञांचा कयास आहे. हि रक्कम गुंतवून भारत सरकारच्या वार्षिक बजेट इतकं व्याज मिळू शकेल. तसेच सगळे टॅक्सेस जरी रद्द करण्यात आले तरी या रकमेच्या सहाय्याने शासन व्यवस्थित चालू शकेल.हे सगळं वाचल्यावर हा देश गरीब आहे असं आपल्याला वाटतय का?
दरवर्षी जवळ जवळ ८०हजार लोक स्वित्झर्लंडला जातात. पैकी २५हजार वारंवार जातात ते कशासाठी ? हौशी प्रवासी म्हणून ? अजिबात नाही. जरा ही माहिती वाचा. अप्रामाणिक उद्योजक, राजकारणी,भ्रष्ट अधिकारी, क्रिकेट खेळाडू,भ्रष्ट अभिनेते,बेकायदेशीर वेश्याव्यावसायिक आणि संरक्षित-वन्यजीव व्यापारी यानी, जळवा जसं रक्तशोषण करतात तसं या भारतभूमीच्या संपत्तीचं आणि वैभवाचं शोषण केलं आहे. हे चित्र आहे फक्त स्विस बँकेतील ठेवीचं. इतर परदेशी बँकांचा आपण विचारच केलेला नाही.
स्विस बँकींग असोशियनच्या २००६च्या अहवालानुसार स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा १४५६ बिलियन डॉलर्स, रशिया ४७० बिलियन डॉलर्स, यु.के ३९० बि.डॉ, युक्रेन १०० बि.डॉ. तर चीन ९६ बि.डॉ.असा आहे. इतर सगळ्या देशाच्या दीडपट इतका काळा पैसा, १९४७ पासून या देशवासीयाना गरीबीच्या खाईत लोटून स्वतःची तुंबडी भरून आणि लुटून नेलेला भारतीयांचा पैसा स्विस बँकेत पडून आहे. वाचकांनो आपणच हिशोब करा ! ही रक्कम आपण परत आणू शकतो काय ?

kripaya hi link paha-1]http://www.yoindia.com/shayariadab/chit-chat-general-discussion/swiss-bank-and-indias-black-money-t55170.0.html

2]http://wiki.answers.com/Q/Total_black_money_in_India

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का? वर टिप्पण्या बंद

सातपातकं !

सातपातकं-”त्यात-विस-पचामा”
पाप आणि पुण्य याविषयी कोणी बोलू लागलं की लोक त्याला वेड्यातच काढतात. कसलं पाप आणि कसलं पुण्य ? असं काही नसतं असं म्हणून अनेक उदाहरणं देऊन पटवण्याचा प्रयत्न सुरू होतो. अमक्याने अमुक इतक्या वाईट गोष्टी केल्या तरी तो मजेत जगतोय. तमक्यानं लोकांना इतकी मदत करूनही तो दुःखात, हाल-अपेष्टात दिवस काढतॊय. इत्यादी. आपल्याला पण मग वाटायला लागतं, खरं काय ? हे की ते ? विचारवंत,संत, महंत यांचं काय सांगणं असतं या बाबत ? त्यांच्यातही एक वाक्यता कोठे आहे ? तेही एकमेकांना नावं ठेवत असतात. मी सांगतो ते बरॊबर, माझ्या मार्गानं गेलात तर तुम्हाला निश्चित मुक्ती मिळणार,वगैरे.
महात्मा गांधीनी सात पातकांचा उल्लेख केला आहे. ”त्यात विस पचामा” चा अभाव हि ती सात पातके आहेत असं ते म्हणतात.त्याग,तत्व,विवेक,सचोटी,परिश्रम,चारित्र्य आणि मानवता या अभावी केलेली कर्मे ही पातके होत असं ते ठासून सांगतात. म.गांधीजीनी एकेका तत्त्वाचा संबंध एकेका व्यवसायाशी जोडलेला आहे. हे कुणाला पटेल कुणाला नाही पटणार ! पण ते काय म्हणतायत ते समजून घ्यायला काय हरकत आहे ? नंतर ठरवता येईल काय करायचे ते ! नाही का? ”त्यात विस पचामा” !
त्यागाशिवाय केलेल्या उपासनेला काहीही अर्थ नाही. त्याग न करता उपासना करणे म्हणजे ते पातकच होय असं म. गांधीजी म्हणत. उपासना करायची असेल तर ती तन,मन,धन अर्पून करावी असं साधू संतानीपण सांगितले आहे. जरा विचार केला तर या म्हणण्यात बरेच तथ्य आहे असं आपल्याला दिसून येते. विद्येची उपासना करायची आहे त्याग करावा लागेल.सत्कर्माची उपासना करायची आहे त्याग करावा लागेल. त्याग करून,लोक कल्याण साधणारं असं जे प्राप्त होईल ते पुण्यप्रद असेल.अन्यथा ते पापच ठरेल. जे कर्म लोक-कल्याणासाठी असेल तेच श्रेयस्कर होय.
तत्वाशिवाय राजकारण म्हणजे पातक होय.तत्वहिन राजकारणाला गांधीजीनी पापकर्म संबोधलं आहे. राजेशाहीत राजा आपल्या राजधर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत असे.त्याच्यावर तसे संस्कार होत असत.प्रजेच्या सुखासाठी राजा स्वतःचं बलिदान द्यायलाही मागे पुढे पहात नसे. आजचे राजकारणी काय करत आहेत? समर्थ रामदास म्हणतात-जाणावे पराचे अंतर । उदासीनता निरंतर । नीतिन्यायासी अंतर ।पडोच नेदावे॥ [दासबोध द११स५/६]. नीतिन्यायाशिवाय राजकारण करणे हे अनुचित होय. दुःख दुसर्‍याचे जाणावे । —बरे वाईट सोसावे । समुदायाचे ॥ असं तत्वाचं राजकारण करावे. असा प्रेमळ सल्ला समर्थ देतात. आणि म्हणूनच गांधीजी तत्वाशिवाय राजकारणाला पातक म्हणतात.
विवेकाशिवाय (आनंद)मौजमजा भोगणे म्हणजे पातक कर्म होय.[pleasure without conscience.] हे तिसरं कर्म अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटते. विवेक म्हणजे सद्‍सद्विवेक होय. सद्‍सद्विवेकाशिवाय मौजमजेसाठी जे कर्म होईल ते पापकर्मच होय. मिरवणूक काढणे, रंग खॆळणे, महोत्सव साजरा करणे इ. मध्ये सद्‍सद्विवेक जागृत ठेऊन इतरांना त्रास हॊणार नाही, नियमांची पायमल्ली हॊणार नाही अशा पद्धतीने आनंद उपभोगणे अपेक्षित असते. पण जेव्हा विवेकाशिवाय केलेल्या कर्मातून आनंद-मौजमजा मिळते ते पातक कर्मच असते, हे ध्यानात घेणे आवश्यक्क आहे.
सचोटीशिवाय उद्योग,व्यापार करणे म्हणजे पातक कर्म होय. उद्योग,व्यवसाय,व्यापारामध्ये सचोटी शिवाय यश मिळत नाही. आपण एकदाच एखाद्यास फसवू शकता, पण फसणारा पुन्हा आपल्याकडे येत नाही,इतकेच नव्हे तर तो इतरांनाही आपल्या पापकर्माबाबत जागे करून आपल्याकडे येण्यास मज्जाव करतो.परीणाम आपल्या व्यवसायावर होतो. व्यवसाय वाढीसाठी सचोटीची आवश्यकता असते. सचोटी असेल तर बाजारार आपल्या शब्दाची किंमत वाढते. त्यालाच आपण पत असं म्हणतो.
परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवणे हे पातक कर्मच होय. भ्रष्टाचार हे या पातक कर्माचं ज्वलंत उदाहरण होय.आजरोजी या पातक कर्माचा सर्वत्र संचार झाला आहे. याचा संबंध नीतिमत्तेशी आहे. नीतिमत्ता गुंडाळून ठेवली की हे पातक कर्म वाढीस लागतं. संतसज्जनानी अशा प्रकारे परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवण्यास प्रतिबंध केला आहे. अशा संपत्तीचा उपभोग घ्यायला सगळे पुढे असतात पण त्यामुळे होणार्‍या पापामध्ये वाटेकरी हॊण्यास कोणी पुढे येत नसते.
चारित्र्याशिवाय ज्ञानसंपादन हे पातक कर्मच होय. ज्ञानदान सत्पात्री करावे असं म्हंटलं जातं. ज्याला ज्ञान द्यावयाचे त्याने त्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी केला पाहिजे. उदा- अणुउर्जेचा वापर चारित्र्यवान व्यक्ति मानवी जीवन सुखावह करण्यासाठी करेल तर दुष्ट व्यक्ती या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण समाजास वेठीस धरण्यासाठी करेल.विमान विद्या, रसायन विद्या,स्फोटक विद्या,मानसोपचार शास्त्र इत्यादी सर्व विद्या अविचारी /दुष्ट व्यक्तींच्या हाती पडली तर काय होतं ते समा्ज अनुभवतोय. याप्रमाणे कोणतंही ज्ञान असो ते मिळवणारी व्यक्ती चारित्र्यवान असली पाहिजे. वैद्यकीय ज्ञान,भौतिक विज्ञान,गणित ज्ञान,इ.प्रत्येक शाखेतील ज्ञानसंपादन करणारी व्यक्ती ते घेण्यास योग्य, लायक, आणि चारित्र्यवान असावी. अन्यथा हे पातक कर्म घडेल. मला हे दुधारी पातक कर्म वाटते. ज्ञानदान करणारा आणि ज्ञानसंपादन करणारा असे दोघेही पातक कर्म करतात असं वाटतं. म. गांधीजी या पातक कर्माला knowledge without character असं संबोधतात.
मानवनिरपेक्ष विज्ञान हे पातक कर्म होय. विज्ञानातील शोध हे मानवाच्या उन्नत्तीसाठी,मानवी जीवन सुखावह करण्यासाठी असले पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळते. अणुबॉंम्बने संपूर्ण गावेच्या गावे बेचिराख करण्याचे, अवघे जीवन उध्वस्त करण्याचे कारणच काय ? काय साध्य झाले यामधून ? या गावातील सर्वसामान्यांनी असा कॊणता गुन्हा केला होता म्हणून त्यांना या अणूबॉम्बच्या वर्षावास सामोरं जावं लागलं ? म्हणून विज्ञानाची मानवनिरपेक्षता म.गांधीना पापकर्म आहे असं वाटते.
वरील “त्यात विस पचामा”ची पातक कर्मे आपल्या हातून घडणार नाहीत याची काळजी आजचा माणूस घेईल का? असा प्रश्न येतोय का मनात? येत असेल तर आपल्याला गांधीजींच म्हणणं पटतय असं समजायला हरकत नाही. अन्यथा ——!!!

Pl.follow this link http://www.doctorhugo.org/gandhi.html

सातपातकं ! वर टिप्पण्या बंद

१.आरोग्य

कुष्ठरोग: एक भयानक रोग पण वेळीच उपचार केले तर पूर्ण बरा होणारा !!

अत्रि ऋषीची कन्या-अपाला. ही विद्वान ब्रह्मवादिनी होती.लग्नानंतर तीला कुष्ठरोग झाला.ती इंद्राची भक्त होती. इंद्राला प्रिय असलेला सोमरस अर्पण करण्याचे व्रत तीने घेतले होते. त्यासाठी  सोमवल्ली वनस्पती ती आपल्या दातानी चावायची. त्याचा रस काढायची आणि अत्यंत भक्तिभावाने तो रस ती इंद्राला अर्पण करायची. इन्द्र ही तिने अर्पण केलेला सोमरस अत्यंत आनंदाने  प्राशन करायचा.अपालाची ही निस्सिम भक्ति पाहून इंद्र तिच्यावर प्रसन्न झाला. आणि त्याच्या कृपेमुळे तिचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला. असी कथा आपल्याला वाचायला मिळते. या कथेचे तात्पर्य काय असावे? असा प्रश्न सूज्ञ वाचकास पडणे स्वाभाविक आहे.

अपालाने तिच्या दातानी चावून काढलेला रस   इंद्र प्यायचा. म्हणजेच अपालाचा कुष्ठरोग असांसर्गिक प्रकाराचा होता, आणि सोमवल्ली चावताना काही रस तिच्या पोटात गेला असणार आणि त्या सोमरसामुळे तिचा कुष्ठरोग बरा झाला असणार. म्हणजेच सोमरसात कुष्ठरोग नाहीसा करणारा गुणधर्म असणार, असा निष्कर्ष या कथेमधून आपोआपच बाहेर पडतो.

आपल्या देशात ८०% कुष्ठरोगी असांसर्गिक ( नॉन लेप्रो)प्रकारचे तर २०% कुष्ठरोगी सांसर्गिक (लेप्रो) प्रकारचे आहेत.दोन्ही प्रकारामध्ये सुरुवातीस त्वचेवर चट्टे उमतात. पण त्याचे प्रमाण कमी जास्त असते.

लेप्रोत (सांसर्गिक रोगात) जास्त चट्टे असतात,कान,चेहरा,त्वचा सुजते. पुढच्या टप्प्याला त्वचेवर गाठी येतात. लेप्रोत पुढचा टप्पा म्हणजे शरीर विकृती. शरीराचे भाग, हातापायाची बोटे झडतात,,नाकाची केवळ भोकेच उरतात,चेहरा विद्रुप सिंहाच्या तोंडासारखा होतो.या रोगात जी काही पडझड होते ती बाह्य शरीराची.आतले अवयव  सहीसलामत राहतात.बाह्य शरीराची पूर्ण वाताहत करून हे  जंतू  आपोआप नाहीसे होतात. अशा रोग्याला “बर्न्ट आउट “ असे म्हणतात.एम लेप्रा जंतू शरीराच्या आतल्या अवयवाना अजिबात धक्का लावत नाहीत. रस्त्यावर जे भिकारी दिसतात ते या प्रकारचे संसर्गशून्य प्राणी असतात. म्हणून हा रोग भयानक –किळसवाणा, अंगावर शहारे आणणारा असा वाटतो. म्हणून अंगावर चट्टे दिसताच लगेच “काटन-पीन टेस्ट ने” संवदेने विषयी निदान करून घेणे अत्यंत महत्वाचे असते.संवेदना नष्ट झाल्याचे निदान असेल तर त्यावर ताबडतोब उपचार सुरु करणे अत्यंत आवश्यक असते. ताबडतोब उपचार सुरु केल्यास पुढे निर्माण होणारी विकृती टळून रोगी लवकर बरा होऊ शकतो.  मात्र चट्ट्यास खाज असेल तर ते गजकर्ण, नायटे, सोरायसिस इ.त्वचा रोगाचे असू शकतात. त्यासाठी वेगळा उपचार त्वचा-रोग तज्ञाकडून करून घेणे इष्ट असते.

नॉन लेप्रो (असांसर्गिक रोगात) प्रकारात हातापयाचे,चेहर्‍याचे,बाह्य शरीराला पुरवठा कराणारे मज्जातंतू विकृत होतात. त्यामुळे हाताचे पंजे वेडेवाकडे,तळ्पायाना व्रण ,क्षतं पडतात,जखमा होतात. या प्रकारचे रोगी अगदी तुरळक असतात.

४-१४ वयोगटात लेप्रसीचे प्रमाण अधिक आढळते.मुलांना येणारे चट्टे लहान,फिकट, आणि फारच थोडे असतात.५४५ केसेस मध्ये हे  चट्टे मांड्या १९%, हात१३%,पाय८%,ढुंगण१८% या प्रमाणात आढळले.

कुष्ठरोगासाठी सद्या डिडीस /डेपसोन –’डायमिनो डायफिनिल सल्फोन ’ या  गोळ्या बरेच दिवस द्याव्या लगतात. दुसरं औषध Refampicine or Clofazimine  ही दोन औषधे लेप्रो (सांसर्गिक रोगासाठी) इन्फेक्शनसाठी असतात. नान लेप्रोसाठी (असांसर्गिक रोगासाठी) देण्याची आवश्यकता नसते. मात्र DDS गोळ्या दोन्ही प्रकारात द्याव्याच लगतात. रुग्ण बरा झाला तरी बरेच दिवस ह्या गोळ्या घ्याव्या लागतात त्यामुळे हा रोग कधीच बरा होत नाही, अशी काहींची गैरसमजूत झालेली असते . मनातली या रोगाबद्दल असलेली भिती आणि गैरसमज काढून टाकून ताबडतॊब उपचार घेणे सुरू करावे अशी कळकळीची विनंती आहे. (संदर्भ:तपस्या–डॉ.सुमती क्षेत्रमाडे)