Savadhan's Blog


या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का?

या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का?
आज रोजच्या प्रमाणे विरोप पहात होतो त्यात एका विरोपाने विचार करायला भाग पाडलं. हा विरोप जरा वेगळ्याच विषयावर होता. त्याचं नाव होतं इंडिया गरीब आहे कां ? अशा अर्थाचं . पण संदर्भ होता स्विस बॅंकेतील पैशाचा. त्यात विरोप लिहिणारा लिहितो की जर ऑलिंपिकमध्ये काळा पैशाच्या ठेवीची स्पर्धा असती तर भारताने हातोहात सुवर्ण पदक जिंकलं असतं, आणि दुसर्या क्रमांकावर रशिया आला असता.
हे वाचून कोणाचंही डोकं गरगरायला लागलं असतं. अशीच या विरोपातील माहिती आहे. पण सामान्य माणूस काय करू शकतो. तरीसुद्धा ही माहिती सर्वसामान्यापर्यंत पोचवली पाहिजे असं मला वाटलं.
आंतर्राष्ट्रीय दबावामुळे स्विस सरकारने , संबंधीत ठेवीदाराच्या देशाने मागणी केली तर त्यांची नावे जाहीर करण्याचे नुकतेच मान्य केले आहे. असं असूनही भारत सरकार मात्र अशा ठेवीदारांचा तपशील का विचारत नाही हा एक गहन प्रश्न आहे. स्विस बँकेतील इतर सर्व देशांच्या काळ्या पैशाच्या ठेवीच्या एकूण बेरजेपेक्षा जास्त इतका काळा पैसा ठेवीच्या रुपाने स्विस बँकेत आहे. असं जर असेल तर आपण भारताचे नागरीक या नात्यांने या संबंधात काय करू शकतो ते तपासणे आवश्यक आहे.
सदर विरोपात पुढे म्हंटले आहे की सरकारवर दबाव येण्यासाठी भारतीय नागरीकांनी एक चळवळ उभारली पाहिजे,आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी मिळालेल्या या सुवर्णसंधीचा फायदा घेतला पाहिजे.
वाचकांनो हे वाचा , आणि जास्तीत जास्त भारतीयांना याविषयी माहिती द्या. याविरोधात एक जबरदस्त चळवळ उभी करूया आणि सुस्त सरकारला कृतीसाठी जागे करूया.असं आवाहन ही पुढे तो करतोय.
भारत हा एक गरीब देश आहे असं कॊण म्हणतं ? या देशातले भ्रष्ट राजकारणी, भ्रष्टाचारी प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांनी परदेशी बँकांमधून, त्यांच्या बेकायदेशीर खात्यात जवळजवळ १५००बिलियन डॉलरची, अफरातफर केलेली रक्कम ठेवलेली आहे. ही रक्कम या देशाच्या परदेशाकडून घेतलेल्या कर्जाच्या १३ पटीपेक्षा जास्त आहे. हा काळा पैसा या चोरांनी भारतीय जनतेस लुटून आणि फसवून मिळवलेला आहे. जर हा प्रचंड काळा पैसा भारतात परत आला तर चोवीस तासात भारत कर्जमुक्त तर होईलच पण घेतलेल्या कर्जाच्या १२ पट रक्कम शिल्लक राहील असा तज्ञांचा कयास आहे. हि रक्कम गुंतवून भारत सरकारच्या वार्षिक बजेट इतकं व्याज मिळू शकेल. तसेच सगळे टॅक्सेस जरी रद्द करण्यात आले तरी या रकमेच्या सहाय्याने शासन व्यवस्थित चालू शकेल.हे सगळं वाचल्यावर हा देश गरीब आहे असं आपल्याला वाटतय का?
दरवर्षी जवळ जवळ ८०हजार लोक स्वित्झर्लंडला जातात. पैकी २५हजार वारंवार जातात ते कशासाठी ? हौशी प्रवासी म्हणून ? अजिबात नाही. जरा ही माहिती वाचा. अप्रामाणिक उद्योजक, राजकारणी,भ्रष्ट अधिकारी, क्रिकेट खेळाडू,भ्रष्ट अभिनेते,बेकायदेशीर वेश्याव्यावसायिक आणि संरक्षित-वन्यजीव व्यापारी यानी, जळवा जसं रक्तशोषण करतात तसं या भारतभूमीच्या संपत्तीचं आणि वैभवाचं शोषण केलं आहे. हे चित्र आहे फक्त स्विस बँकेतील ठेवीचं. इतर परदेशी बँकांचा आपण विचारच केलेला नाही.
स्विस बँकींग असोशियनच्या २००६च्या अहवालानुसार स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा १४५६ बिलियन डॉलर्स, रशिया ४७० बिलियन डॉलर्स, यु.के ३९० बि.डॉ, युक्रेन १०० बि.डॉ. तर चीन ९६ बि.डॉ.असा आहे. इतर सगळ्या देशाच्या दीडपट इतका काळा पैसा, १९४७ पासून या देशवासीयाना गरीबीच्या खाईत लोटून स्वतःची तुंबडी भरून आणि लुटून नेलेला भारतीयांचा पैसा स्विस बँकेत पडून आहे. वाचकांनो आपणच हिशोब करा ! ही रक्कम आपण परत आणू शकतो काय ?

kripaya hi link paha-1]http://www.yoindia.com/shayariadab/chit-chat-general-discussion/swiss-bank-and-indias-black-money-t55170.0.html

2]http://wiki.answers.com/Q/Total_black_money_in_India

Advertisements
या भारत देशाला वाचवणारा कोणी आहे का? वर टिप्पण्या बंद