Savadhan's Blog


निसर्गप्रेमी संत !

 • निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण.
 • त्याची नॊंद अभंगात.
 • निसर्गावर उत्कट प्रॆम.
 • निसर्गाशी एकरुप.
 • निसर्गात ईश्वराची अनुभूती !!
 • निसर्ग दर्शनानॆ मन प्रसन्न हॊतॆ!
 • पर्यावरण संवर्ध संत
 • संत तुकाराम, संत ज्ञानॆश्वर, संत जनाबाई, संत कबीर, संत सावतामाळी, संत चॊखामॆळा अशी समस्त संतांची मांदियाळी समाजाला अभंगाद्वारॆ निसर्गावर प्रॆम करायला शिकवतॆआनंदाचॆ डॊही आनंद तरंगमनमॊहक आणि विलॊभनीय! अशा निसर्गात ईश्वराची अनुभूती  घेता येते !! नव्हे ती अनुभूती मिळतेच ! ☻ हिंदू-संस्कृतीमुळॆच पर्यावरणाचे  संवर्धन☺ आजपर्यंत झाले आहे.पण माणसाने अंतःप्रज्ञेचा कौल मानायचं सोडून तर्कप्रज्ञेची कास धरली, आणि त्यामुळे निसर्गापासून माणुस दूर दूर जाऊ लागला आहे, निसर्गाला ओरबाडू लागलाय. भारतीय-हिंदू-संस्कृतीने वर्षभर निसर्गाशी जवळीक साधलीय.  प्रत्यॆक महिन्यात किमान एक सण साजरा करुन निसर्गाशी  जवळीक साधण्याची किमया या संस्कृतीने साधलीय.
 • चैत्र-गुढी पाडवा-:आरॊग्यासाठी कडूनिंब-पानॆ सॆवन.
 • वैशाख-अक्षय तृतिया-: आमरस पॊळी. ज्यॆष्ठ- ज्यॆष्ष्ठागौरी,वटपौर्णिमा :- वटपूजा, कैरीडाळ, पु.पॊळी.
 • आषाढ-व्यासपूजा,दीपपूजा चातुर्मास्यारंभ-:व्रतवैकल्य, उपास. श्रावण-नागपं,नारळीपौ,पोळा-:दिंडॆ, नारळीभात, बैलपूजा.
 • भाद्रपद-हरितालिका,गणॆश४, ऋषि५, महालय -: मॊदक, पत्री
 • आश्विन-नवरात्र,दसरा,कॊजागिरी, वसु१२,धन१३, नरक१४-:उपास,पु.पॊळी,दूध, फराळ,गॊवत्सपूजा.
 • कार्तिक-बलि१,यम२(भाऊबीज),पांडव५, तुलसीविवाह,चातुर्मास्यसमाप्तिः मिष्टान्न,नववस्त्रधारण. मार्गशीर्ष-दत्तजयंती,दॆवदिवाळी-: उपास,पु.पॊळी
 • पौष-शाकंभरी दॆव्युत्सव मकरसंक्रांत-: तीळगुळ माघमहाशिवरात्र-: उपास
 • फाल्गुन-हॊलिकॊत्सव,रंग५-: पु.पॊळी
 • दरमहा शुक्ल व वद्यपक्ष एकादशी,चतुर्थी-: उपास .महाशिवरात्र-ब्रह्मा-विष्णु-महॆशपूजन
 • पर्यावरण संवर्ध संतानी सतत निसर्गाची आठवण ठेवली, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. निसर्गाला ऒरबाडण्याची भाषा संतांनी कधिही कॆली नाही. निसर्गात राहून,थॊडसंच घॆऊन,पुनःसर्व त्यालाच अर्पण करायला सांगणारी हिंदूसंस्कृती व संतांची मांदियाळी  ही सदैव पूजनीय ,वंदनीय आहे !!
 • आज आपण काय करत आहॊत ?
 • वृक्ष संवर्धन कि नाश (आपटा),प्राणीमात्राचॆ संवर्धन कि निर्वंश, जलस्रॊत संवर्धन कि प्रदूषण (निर्माल्य),निसर्ग संवर्धन कि नाश ? [पृथ्वी,आप,तॆज,वायु,आकाश-प्रदूषणाने ग्रस्त आहेत ], समारंभाच्या नावाखाली अन्नाची प्रचंड नासाडी  चालू आहे. रोज किती टन अन्न वाया जातं त्याची मोजदादच नाही.
 • इंधनाची प्रचंड नासाडी होत आहे.वाहनांची बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे  प्रचंड प्रमाणात कर्बॊत्सर्जन होऊन वायु प्रदूषण होत आहे. हे काय चालले आहे ? आपण काय करत आहोत ?
 • कुठलॆच नियम पाळण्याची आपल्याला इच्छा नाही. नियमावली पुस्तकात धूळ खात पडलेली आहे
 • आपण खरॊखर सुशिक्षित आहॊत काय ? असा प्रश्न मला पडलेला आहे. .मला काय त्याचॆ? चलता है यार !!! या विचारसरणीने आपणा सर्वांचेच नुकसान होत आहे. हे आपल्याला कधी समजणार ?
 • पर्यावरण संवर्ध संतांचा विचार करत असता समर्थांचा आवर्जुन उल्लेख करावाच लागतो. त्यांचा अनुल्लेख हा कृतघ्नपणा ठरेल.  पण आम्ही कृतघ्न ही आहोत ,हे त्यांच्याविषयी आपण  दाखवत असलेल्या अनास्थेवरुन ध्यानी येतेच. समाजसुधारण्यासाठी  त्यांनी जे उपाय सुचवले आहेत तिकडे आपण लक्ष न दिल्याने आज समाजातील विविध घटक  आत्महत्या सारख्या टोकाच्य़ा  भूमिका घेत आहेत, हि लांच्छनास्पद बाब आहे.
 • संत साहित्यात समर्थांचा दासबॊधामध्ये जीवसृष्टी, पर्यावरण याविषयी सॊप्याभाषॆत विशॆष माहिती दिली आहे.[ Ref: prof- Mahajan’s article in SAKAL]
 • पाणीहवापृथ्वीवनस्पतीअन्नप्राणीजीवसृष्टी असा क्रम समर्थांनी दिला आहेस.
 • झाडास झाडॆ खतपाणी ।घालून पाळिली प्रतिदिनी॥ वल्लीमध्यॆ जळ संचरॆ कॊरडॆपणॆ हॆ वावरॆ वॊलॆवाचून नाथिरॆ काहीकॆल्या [दासबॊध]
 • प्राणीदॆह झाडॆच : समर्थall flesh is grass: Bible
 • जैववैविध्य आणि विविधतॆत एकता याचं सुरॆख वर्णन समर्थांनी केले आहे.
 • नाना खॆचरॆ आणि भूचरॆ नाना वनचरॆ  आणि जळचरॆ नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचॆ तरंग यॆक सुरंग यॆक विरंग यॆकॆ सुकुमारॆ यॆकॆ कठॊरॆ किती म्हणौनि सांगावॆ शरीरभॆदॆ आहारभॆदॆ  वाचाभॆदॆ गुणभॆदॆ अंतरी वसि जॆ भॆदॆ यॆकरुपॆ [दासबॊध]
 • निसर्ग संवर्धनानॆ वातावरण,पर्यावरण शुद्ध होते असे समर्थांनी ३५०-४०० वर्षापुर्वीच सांगून ठेवले आहे .
 • संतांनी पर्यावरणाचं अतिशय सुंदर वर्णन कॆलॆय ! सर्व जीवसृष्टीचं आपल्यावर अनंत ऋण आहॆत. त्यांचॆ पालन, सांभाळ कॆला तरच सर्वांचा टिकाव लागॆल, असं सर्व संत दॊहॆ / अभंगाद्वारॆ पदॊपदी सांगत आहॆत. पण तिकडे लक्ष द्यायला सवड कुणाला आहे ?
 • सूक्ष्मजीव धुलीकणाहून सूक्ष्म आहॆत याची माहिती समर्थानी दासबोधात दिली आहे. ते म्हणतात  उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक पृथ्वीचॆ मूळ जीवन जीवनाचॆ मूळ दहन दहनाचॆ मूळ पवन थॊराहून थॊर ज्वलनातून जल निर्मिती’ होते याचॆ ज्ञा समर्थाना कसॆ झाले असावे, असा आपल्याला प्रश्न पडणे स्वाभाविक आहे .
 • संत सावता महाराज स्वतःमाळीत्याना शॆतमळापंढरीतर भाजीपालाविठाईचवाटॆकांदा मुळा भाजी अवघी विठाई माझीहा संदॆश प्रत्यक्ष जगणारा निसर्गपूजक माळीसमाज आज शैक्षणिक, आर्थिक,बौद्धिक,आध्यात्मिक क्षॆत्रात आघाडीवर आहॆ. याचं श्रेय त्या संताकडेच जातं.
 • उदक नाना सौख्यदायक !! वल्लीमध्यॆ जळ संचरॆ कॊरडॆपणॆ हॆ वावरॆ । वृक्षवल्ली वनचरॆ आम्हा सॊयरी ! अशा वचनातून संतानी निसर्गाशी जवळीक साधली. निसर्गशांत – जगशांत!!! तरच आपण ही सुखासमाधनाने जीवन जगू शकतो याची जाणिव संताना पदोपदी होती.
 • वैश्विक तापमान वाढ- पहिली  जाणीव इ.स.१८९६मध्यॆ झाली.
 • इंधनज्वलन⇢प्रदूषण⇢तापमान वाढ गृहितक १९५७ मान्य करण्यात आले.
 • १९८०नंतर तापमान वाढीवर स्पष्टपणॆ चर्चा सुरू झाली.
 • १९९२मध्यॆ पहिली वसुंधरा परीषद-रिऒ- येथे सखॊल चर्चा झाली.
 • तापमान वाढीस प्रगत दॆशच जबाबदार असा वसुंधरा परीषदॆचा निष्कर्ष या परिषदेत जाहीर झाला!!!
 • निकॊलस स्टर्न –ब्रिटनचे आर्थिक सल्लागार : तापमान वाढ व प्रदूषण यामुळॆ युद्धजन्य परीस्थिती निर्माण झाली आहे  असा धॊक्याचा इशारा ऑक्टॊ २००६ मध्यॆ  दिला.
 • कर्बवायुचॆ उत्सर्जन रॊखण्यासाठी प्रचंड निधीची गरज आहे असे त्यानी सांगितले. हा निधी वाचवण्याचा विचार म्हणजॆ जगाचा विनाश !!!!!!!!
 • मात्र भारतात संत तुकाराम महाराजानी सुमारे  चारशे वर्षापूर्वी समाजाला साद घातली ! वृक्षवल्ली वनचरॆ आम्हा सॊयरी ।   पक्षीही सुस्वरॆ आळविती ॥ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाला दिला.
 • सर्व धर्मातील संतसज्जनानी या चराचरावर नितांत प्रॆम कॆलॆ आणि सहजॊद्गार काढलॆ !
 • ऎसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती ॥ व्याघ्रया शब्दाची उत्पत्ती आपल्या शिष्यगणांना उकलून दाखवण्यात दॆहभान हरपून गॆलॆल्या ऋषीस वाघानॆ झडप घालून गिळंकृत कॆलॆ तरीही त्यास विरॊध कॆला नाही. निसर्गाशी पूर्ण तादात्म्य !!! अशी शिकवण संतानी समजास दिली.
 • पर्यावरण विध्वंस माणसाचाच नव्हे सार्‍या सृष्टिवा  घात करेल कि काय  अशी भिती वाटते??
 • माणूस निसर्गाचा पहिला मारॆकरी आणि त्याबरॊबर तॊ स्वतःचा ही विनाश करॆल की काय ? अशी आज परिस्थिती आहॆ.
 • अणूऊर्जा, जनुकशास्त्र, रसायनशास्त्र, खगॊलशास्त्र, संगणकशास्त्र आणि इतर सर्व आधुनिकशास्त्रॆ-या मध्यॆ          हॊत असलॆली प्रगती(?) माणसास कॊठॆ नॆत आहॆ?!! आणि त्यामुळे काय होणार आहे ? क्षुल्लक ध्यॆयासाठी सर्वश्रॆष्ठाचा विध्वंस तर हॊणार नाही ना ?-:असं  बर्ट्रांड रसॆल यांनी म्हटलं यात बरेच तथ्य आहे असं आज वाटतं.
 • नकॊ नकॊ हा विध्वंस!!
 • जल,जंगल,जमीन या त्रयीवर माणसाचॆ अस्तित्व अवलंबून. बिफसाठी जंगल तॊडून कुरणाची निर्मिती.              [यु.एस्.ए], कारखाना-सांडपाण्यामुळॆ जमीन नापिक [बडॊदा], [इ.सर्वत्र] कचरा,निर्माल्य,प्रॆतॆ,इ.मुळॆ-:नदीचे  प्रदूषण होत आहे. त्या गटारगंगा होत आहेत -[सर्व] [पुणॆ,दिल्ली,काशी,इ],
 • संतांच्या उपदॆशाकडॆ पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आज ही अवस्था झाली आहे.
 • वैश्विक तापमान वाढ रॊखण्यासाठी ऊर्जाबचतीच्या  मार्गाचा आपण जाणिवपुर्वक अवलंब करायला हवा आहे.  सौर,पवन,जैव ऊर्जॆचा वापर. घरी, कार्यालयात सीएफएल दिवॆ वापर.
 • पालिका पुरवत असलॆलॆ शुद्ध पाणी पिण्यासाठी व   हात उपशाचॆ(बॊरींगचॆ)पाणी इतर कामासाठी.                                घरी कपडॆ धुण्यासाठी आठवड्यातून१दिवस निवडून कमीत कमी थंडपाणी वापरावॆ.
 • शक्यतॊ पायी/ सायकलनॆ/ सार्वजनिक वाहनानॆच प्रवास करावा.
 • वाहनाच्या टायर मध्यॆ हवॆचा दाब यॊग्य ठॆवावा. सिग्नलला आपलॆ वाहन बंद/चालू करता यॆईल असॆ तंदुरुस्त ठॆवावॆ.
 • घरात,कार्यालयात नैसर्गिक प्रकाश भरपूर मिऴॆल अशी,भिंतीना शुभ्र रंगसंगती ठॆवावी.
 • पाणी तापवण्यासाठी वीज मुळीच न वापरता शक्य असॆल तर सौरऊर्जा वापरावी.
 • ५चंद्रिकायुक्त कार्यक्षम यंत्रॊपकरणॆच खरीदावीत.
 • आपल्या सॊसायटीमधील सार्वजनिक दिवॆ ऊर्जाबचत दिवॆ लावून बदलून घ्यावॆत. सार्वजनिक दिवॆ सायंकाळी ऊशीरा७.३० वाजता चालू व    पहाटॆ ५.३०/ ५.४५वाजता बंद करावॆत.
 • बाजारहाट करताना कापडी,तरटी,कागदी पिशव्याच वापरा. प्लॅस्टीकचा वापर कमी करा.
 • रिमॊटनॆ टीव्ही,व्हीसीआर सारखी उपकरणॆ बंद न करता थॆट मुख्य बटनानॆच बंद करा. अनॆक इंडीकॆटर्स न वापरता एकच चालू ठॆवावा.
 • पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय करुशकतॊ?
 • आपल्या परिसरात माणसागणिक एक झाड वाढवा.
 • आठवड्यातून एक दिवस वाहनास विश्रांती, इंधन विरहीत स्वयंपाक –दहीपॊहॆ,फळॆ,दुध ,दही.
 • गणॆश,लक्ष्मी यांच्या मातीच्या मूर्ती वापरूया.
 • नदीत ऒला-सुका कचरा न टाकता त्याचॆ खत करुया.
 • सिगारॆट,दारु याऎवजी वृद्धाश्रमी फळॆ वाटून आनंद साजरा करुया.
 • फटाकॆ वाजवण्याऎवजी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करुया.
 • संतांच्या उपदॆशाचॆ पालन करून धरतीमातॆस तापमान वाढीपासून वाचवूया ! पर्यायानॆ जीवसृष्टीस वाचवूया!!
Advertisements

३.विपश्यना -एक आनंददायी अनुभूती !

एक आनंददायी अनुभूती !
विपश्यना साधना अत्यंत कठीण असते असं माझी मित्रमंडळी म्हणत असत. १०दिवस मौन धारण करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये ओ ! मला वाटायचं नुस्तं मौन धरायला काय त्रास पडतोय ? आपण हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करायचाच. सरकारी कार्यालयात नेहमीच्या शिरस्त्यानुसार एक परिपत्रक आले.  “विपश्यनेला जाऊ इच्छिणार्‍यानी आपली नावे नोंदवावीत”. कोणीच पुढे यायला तयार नव्हते. हे !! काम सोडून कोण जाणार? असा थोडासा नकारात्मक सूर. मी आपला होकार लगेच कळवून ही टाकलेला असतो. एक अनामिक हुरहुर मनात असते.आपल्याला हे जमेल का? १० दिवस मौन हे एक वेळ ठीक आहे हो .पण अर्ज भरताना त्यातल्या अटी वाचल्यावर एका अटीने मनांत थोडे धाकधुक वाटत असते . ती अट म्हणजे रोज दुपारी १२ वाजण्याच्या आत एकदाच जेवणे , मात्र नविन साधकांना सायंकाळी ५-१५ वाजता थोडेसे चुरमुरे आणि एक कप चहा किंवा दूध घेण्याची सवलत. हे जरा मला कठीण वाटत असते. तसं एकादशी, गुरुवार, शनिवार असल्या उपासाची मला संवय असते. पण या एकभुक्तपणाची शरीराला कधीच माहिती नसते. साधने बद्दल बाकी काहिच माहिती नाही, अर्ज तर दिलेला आहे. अनेक लोक ही साधना करतात. मग मी पण ही साधना करणारच अशा आत्मविश्वासाने धम्मानंद -मरकळ-पुणे येथे पहिल्या शिबीराला हजर राहतॊ. त्याच आत्मविश्वासाने दुसरं शिबीरही पार पाडतो. इतरानीही याचा लाभ घ्यावा म्हणून हा लेखन प्रपंच !
नावनोंदणी झाल्यावर सायंकाळी ७वाजता १०दिवसाच्या शिबीराची एकूण रुपरेषा विशद केल्यावर मौनास सुरुवात होते. करपल्लवी,नेत्रपल्लवी किंवा इतर कुठल्याही माध्यमाद्वारे बोलण्यास संपुर्ण मनाई असते. आवारात फिरत असाल तर आपल्या पायाकडे नजर ठेवावी अशी सूचना मिळालेली असते.सुरुवातीला पहिल्या दिवशी काही फारसं वाटत नाही पण दुसर्‍या पासून हे सांभाळणं किती कठीण आहे याची जाणिव होऊ लागते. अनाहूतपणे आपल्याकडून हातवारे,हावभाव,नेत्रकटाक्ष इ.चा अवलंब होतो तेंव्हा सेवक-साधक हे टाळण्याची मुकपणे विनंती करत असतो. मनात अनेक विचाराचे तांडव चालू असते आणि आपल्याला त्यावर कटाक्षाने ताबा मिळवायचा आहे याची जाणिव सतत होत राहते. मौन,ब्रह्मचर्य,अहिंसा या शीलांचे पालन याची ही सुरुवात असते. आपले पुर्वसंस्कार त्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. रोज संध्याकाळी ७ ते ८-३० या वेळात प.पू मुख्य आचार्य गोयंका महोदय यांच्या व्हिडीओ- प्रवचनामध्ये आज आपल्याला झालेल्या त्रासाचा उल्लेख ऐकून आणि त्यावर करावयाची उपाय योजना ऐकून हळुहळु मनाचा निर्धार वाढत जातो.
पहिल्याच दिवशी दुपारी, रात्रीचे जेवण मिळणार नसते या कल्पनेने ,भरपेट जेवण घेतलेले असते. साधकाला त्यामुळे काय त्रास हॊणार याची सुतराम कल्पना नसते. या पहिल्या जेवणानंतर दुपारी १ते ५ असे चार तासाचे ध्यान करावयाचे असते हे साधकाच्या गावीही नसते. त्यामुळे ध्यानाला बसल्यावर बहुतेक नविन सर्व साधकांना दर २-५ मिनिटांनी सारखे ढेकर येऊ लागतात,अनेकांना गुबार्‍याचा पण खूप त्रास होत असतो आणि याचा उल्लेख सायंकाळच्या पहिल्या प्रवचनात  झालेला ऐकल्यावर आपल्याला आपली चूक उमगते. त्यामुळे मी दुसर्‍या दिवसापासून हळुहळु आहारात काटछाट करण्यास सुरुवात करतॊ.बरे संपुर्ण उपास पण करायचा नाही, आणि अति आहार पण  टाळायचा ,दोन्हीचा सुवर्णमध्य साधायचा असा प्रेमळ सल्ला प्रवचनात दिलेला असतो, त्यानुसार ३र्‍या दिवसापासून  फक्त एक मूद भात  त्यावर पुरेसे साधं वरण आणि दोन वाट्या ताक असा माझा आहार मी निश्चित करतो. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहून साधना विनासायास पार पडण्यास मदत होते असा माझा अनुभव आहे.
पहाटे ४ वा. उठून ४-३०ला ध्यानास सुरुवात व्हायची. २ तास ध्यान झाल्यावर दीड तास विश्रांती,याच वेळात चहापान, स्नान उरकून परत ३तास ध्यान आणि नंतर २तास विश्रांती, यावेळात जेवण उरकून परत ४तास ध्यान झाल्यावर १तास विश्रांती ,यावेळेत नविन साधकांना सायंकाळचा अल्पोपहार तर जुन्या साधकांना एक ग्लास सरबत, यानंतर परत ३तास प्रवचन व ध्यान.रात्री ९ ते पहाटे ४ निद्रासन. रोज   बारा तास ध्यान ! ! हा रोजचा परिपाठ ध्यानी येतो ते दुसर्‍या दिवशी.
दोन दिवस आनापान ध्यानाविषयी माहिती सांगितली जाते. त्यातील अनुभूती येत असते. सगळं अंग आता ठणकू लागलेलं असतं. कुठून या फंदात पडलो असा विचार मनात  डोकावत असतो आणि सायंकाळच्या प्रवचनात नेमकं ह्याच बाबीचा उल्लेख  ऐकून आपल्याला हायसं वाटतं. साधने विषयी आपली काहीतरी प्रगती होत आहे हे ही जाणवत राहतं. आता उद्यापासून “विपश्यना ध्यान” करावयाचे आहे हे साधकांच्या मनावर अलगदपणे ठसवलं जातं. आता साधकांची मानसिक तयारी बरीच झालेली असते. पण आज अशी अवस्था असते की प्रत्येक साधक जो प्रामाणिकणे साधना करत असतो तो जमिनीवर दोन हात ठेवून सावकाश उठण्याचा प्रयत्न करत असतो. दोन दिवस सांगितलेले असते- “आते जाते सांसपर  करे निरंतर ध्यान , कर्म के बंधन टुटे होये परम कल्याण ! हे गुरूजींचे शब्द सतत कानांत रूंजी घालत असतात. त्याच तंद्रीत  रात्री ९ वाजता अंथरूणावर पडल्यावर कधी डोळा लागतो ते कळत नाही. पण ही अर्धवट तंद्री असते. गाढ झोप आपल्याला येतच नसते. अनेक विचार मनात येत असतात. लहानपणापासून ते आज पर्यंत आपल्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांची, नातेवाईकांची सतत कसली ना कसली आठवण आणि त्याविषयीचे विचार मनात सतत घोळत असतात. मन तळमळत असते. त्याकडे साक्षी भावाने पहायचे असे प्रवचनात सांगितलेले असते. एक वेगळीच अनुभूती यावेळी आपण घेत असतो.
पोटात काही नसते, अर्धपोटीच असतो आपण. त्यामुळे पहाटे अडीच-पावणेतीनलाच  खडखडीत जाग येते. वास्तविकता साधकाने रात्रभर झोपेपेक्षा  एकांतवासाचा अनुभव घ्यावा असं प्रवचनात उपदेश केलेला असतो. सतत आनापान ध्यान ! होय आनापाना ध्याना बाबत आपण हळुह्ळु सजग होऊ लगतो. पण मला वाटते  याविषयीची जाणिव मला दुसर्‍या वेळी शिबीरास गेलो तेव्हा जास्त झाली,इतरांनाही म्हणजे जे गंभिरपणे ही साधना करत असतील त्यांना असाच अनुभव येत असावा.
आता तिसर्‍या दिवसापासून दहव्या दिवसाप्रर्यंत  विपश्यना ध्यान करायचे. ध्यानास सुरुवात करत असताना आपल्याला सुचना मिळत असतात. आपण आपले मन त्या सूचनेनुसार वरच्या ओठावर नासिकाग्राखाली एकाग्र केलेले असते. सुखद किंवा दुःखद संवेदनेची अनुभूती येत असते,अगर येत नसते, अगर काहीही संवेदना होत नसते, त्याकडे समत्व बुद्धिने पहाण्याची सूचना सतत मिळत असते. त्याच वेळी आता मन आणखीन सूक्ष्म करावे अशी सूचना मिळते. आपण ध्यानमग्न अवस्थेत गेलेलो असतो. आता हे सूक्ष्म मन ब्रह्मरंध्राकडे नेण्याची सूचना मिळते, तेथील संवेदना निरिक्षण करण्याची सूचना मिळते. रोज यामध्ये आपली हळूहळु प्रगती होत असते. ब्रह्मरंध्रा कडून हळुहळु सूक्ष्म मनाचा प्रवास संपूर्ण चेहरा, डोक्याचा भाग, कान,गळा, खांदे,दोन्ही हात,हाताची बोटे, छाती, पोट, पाठ, कमर, दोन्ही मांड्या, पाय ,घोटे ,पायाची बोटे असं संपूर्ण शरीरभर मनाचा प्रवास संवेदनेची अनुभूती घेतघेत होत राहतो, परत पायापासून ब्रह्मरंध्रापर्यंत हेच चक्र पुनःपुन्हा करत रहातो आपण ! याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे हेच जास्त महत्वाचे असते. शब्दातीत अशी ही अनुभूती येथे मांडता येणे  कठीण. अवर्णनीय, आनंदमयी अशी ही अनुभूती परत परत मिळावी यासाठी शरीर आसुलेले असते पण तेव्हढ्यात त्याचीही आस न ठेवता समत्व बुद्धिने याचे निरिक्षण करत राहण्याचे अवधान येते. अवघे विकार शांत ———–शां–त —–शां—————-त झालेले असतात. I think total sablimation of VIKARA !!
मला आलेली एक अनुभूती —— विपश्यना कशी करावी याच्या सूचना मिळत असतानाच वरच्या ओठावरील सूक्ष संवेदना मनास जाणवते, तत्क्षणी ही संवेदना सूक्ष्म मनाच्या सहय्याने ब्रह्मरंध्रा कडे नेण्याची सूचना मिळते.तेथे त्या संवेदनेचे निरीक्षण सूक्ष्ममन करत असते तोच त्या संवेदनेचे धारदार पाते करुन देहाचे आडवे छोटेछोटे काप करून संवेदनेचे निरिक्षण सूक्ष्म मनाने करण्याची सूचना मिळते.आता संवेदना डोक्यावरील ब्रह्मरंध्रावरून निघून कपाळ ते डोक्याची मागची बाजू याक्रमाने संपूर्ण शरीराचे पायाच्या अंगठ्यापर्यंत आडवे काप करत संवेदनेच्या संपूर्ण प्रवासाचे अवलोकन, त्रयस्थपणे- समत्व ठेवत, म्हणजे सुखद-संवेदना असो वा नसो,दुःखद-संवेदना असो वा नसो, कुठलीही प्रतिक्रिया न देता, सूक्ष्ममन निरिक्षण करत राहते. ही क्रिया नखशिखांत वरून खाली-खालून वर पर्यंत संपूर्ण एक ध्यानसत्र (तीनतास) चालू असते.जसे आडवे काप करत असतो तसेच उभे काप करतकरत पण एक वेगळी अनुभूती मिळत राहते. जे सुखासन घातलेले असते ते तसेच असते. ध्यान समाप्ती ची सूचना आता मिलते, आपण हळूहळु परत आपल्या मूळ अवस्थेत येत राहतो तेव्हा भवतु सब्ब मंगलम –!     भवतु—- सब्ब—- मंगलम –!!     भवतु————- सब्ब———– मंगलम –!!! असा मुख्य आचार्यांच्या आवाजात ला उद घोष कानावर पडत असतो . साधू !साधू—!साधू !!! म्हणून आपण प्रतिसाद देत असतो !!!
दुसर्‍या ध्यानसत्रात यापेक्षा वेगळी अनुभूती आली .प्रत्येकाला विविध अनुभव येत असतात. पिंडे पिंडे ——भिन्ना!!! हेच खरं !
प्रत्येक ध्यानसत्रात टेपवरून  हिंदी आणि इंग्रजीतून सूचना आपल्याला मिळत असतात, सत्राची सांगता  तेरा मंगल… ! तेरा मंगल…….! ते…रा…मंगल होय रे…….!!!  भवतु सब्ब मंगलम… !  भवतु सब्ब मंगलम… !  भवतु ——-सब्ब —–मंगलम…   !!! सबका भला हो ! सबका—- भला—– हो !
सबका ——–भला———- हो !!!!!  अशा  घोषणांनी होत असतो ! आपलं मन अत्यंत आनंदमय अवस्थेत असते, एका अननुभूत अशा शांतीचा आपण अखंड आस्वाद घेत असतो.
दहाव्या दिवशी सकाळी ८ते ११ च्या ध्यान सत्रात व्हिडिओद्वारा प.पू गोयंका  “मित्त ध्यान” याविषयीची माहिती देतात, आणि त्यानंतर आपलं दहा दिवसाच्या मौनाची समाप्ती होते. सगळ्यांना खूप बोलावसं वाटत असतं पण ध्यानकक्षात मौनच पाळायचे असते. तसेच पुरुष साधकांनी पुरुषसाधकाशी व स्त्रीसाधकांनी स्त्रीसाधकाशीच हलक्या आवाजात वार्तालाप करण्यास हरकत नसते.
स्वतःला बोधी प्राप्त झाल्यावर बुद्धाने आपल्याबरोबरच्या साधकांना आवाहन केले ” उठा जागे व्हा ! ” इतिवुत्तकम २.१० मधील हे आवाहन असे आहे —“जागरन्ता सुणाथेतम्ये सुत्ता ते पबुज्झथ । सुत्ता जागरितं सेय्यो नात्थि जागरतो भयं ॥ “ जे जागे आहेत त्यांनी हा संदेश ऐकावा. जे झोपलेले असतील त्यांनी जागे व्हावे. झोपण्यापेक्षा जागे असणे जास्त लाभदायक आहे. जागृत अवस्थेत कोठलेही भय नाही.
या शिबीराच्या समाप्तीनंतर ’शील,समाधी,प्रज्ञा’ यापैकी आपण कुठे पोचलो आहोत याचा ज्याचा त्यानेच शोध घ्यावा. शिबीर आवारातून १२व्या दिवशी सकाळी दोन तासाचे ध्यान झाल्यावर नाश्ता करून आपल्या घराकडे प्रयाण करतो, तेव्हा आपल्या मनात गुंजन चालू असते  भवतु सब्ब मंगलम… !  भवतु ——-सब्ब —–मंगलम…   !!! सबका भला हो ! सबका—- भला—– हो ! सबका ——–भला———- हो !!!!!

२.विपश्यना !!!

खडतर असे ही साधना । कठीण साधना विपश्यना ॥१॥

शील,समाधी,प्रज्ञा या अंगा । तू जाणून घे रे बा साधका ॥२॥

प्रथम शीलाचे ते पालन । ब्रह्मचर्य,अहिंसा नि मौन ॥३॥

कठोर मौन ते दहा दिन ।ध्यान आनापान दोन दिन ॥४॥

येत्या जात्या श्वासावर ध्यान। निरंतर, होतसे आनापान॥५॥

वरच्या ओठी करता ध्यान ।संवेदना सुखदुःखाची जाण ॥६॥

ठेवून समता तू साधका । विपश्यनेचे मर्म हे जाण ॥७॥

आठ दिन होई विपश्यना । सांगता होतसे “मित्त” ध्याना ॥८॥

“विपश्यना” साधना कठीण । तास बारा रोज ध्यानासन ॥९॥

सात तास मिळे निद्रासन । पाच तास विश्राम हे जाण॥१०॥

अशी ही साधना कठीण । स्वतःस विशेषत्वाने तू  जाण ॥११॥

सर्वांचे मग होवो मंगल! । सर्वांचे मग होवो मंगल!! ॥१२॥

सर्वांचे मग होवो मंगल !! । त्रिवार घोष, होई कल्याण ! ॥१३॥

प्रतिक्रियेसाठी शिर्षकावर क्लिक करावे.

१.खडतर आणि कष्टदायक साधना-विपश्यना !

विपश्यना साधना ही अत्यंत खडतर अशी ध्यान साधना आहे. मनाचा निग्रह करूनच या साधनेस सुरुवात करावी लागते. साधनेस सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आहे याची निश्चित माहिती दिली जाते. दिलेल्या सूचनांचे अत्यंत कठोरपणे पालन केल्यास त्यात आपली योग्य दिशेने प्रगती होत राहते. प्रत्येक पायरीवर प्रत्यक्ष अनुभूती घेत पुढची वाटचाल करत राहणे हेच या साधनेत अपेक्षित असते. अडथळा आल्यास सहाय्यक आचार्य मार्गदर्शनासाठी असतात. जाणीवपूर्वक आणि आळस न करता त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणे आवश्यक असते.

साधना स्थळी आगमन होताच आपली नावनोंदणी करून, आपल्याजवळील मूल्यवान वस्तू ,ताईत, गंडे,दोरे,जे असेल ते तेथील एका पिशवीत भरून व्यवस्थापकाकडे जमा केल्यावर,आपल्याला आपला खोली क्रमांक व त्याची चावी दिली जाते. सायंकाळी ठराविक  वेळी साधनेची माहिती दिल्यावर १० दिवसाच्या मौनास सुरूवात होते. हावभाव किंवा करपल्लवीच्या माध्यमाने किंवा दृष्टीने  देखिल एकमेकाशी संपर्क साधण्यास संपूर्ण मनाई असते.दृष्टी जमिनेकडे ठेऊनच मर्यादित क्षेत्रातच   चालायचे असे बंधन असते. शीलाचे पालन अनिवार्य असते.शील म्हणजे मौन,अहिंसा,ब्रह्मचर्य यांचे कडक पालन करणे होय. तंबाखू बिडी,इ. वस्तुंचे सेवन  वर्ज्य असते, स्त्री व पुरुष साधकाने पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरणे आवश्यक असते. तसेच साधना काळात कुठलाही जप,भजन,व्यायाम इ.सर्व अन्य बाबी करण्यास पूर्णता बंदी असते. साधकाने केवळ याच साधनेचा अभ्यास करावयाचा असतो. रोज ४ सत्रात ही साधना केली जाते. २तास+ ३तास+ ४तास+ ३तास अशी एकूण १२ तासाची ध्यानासाठीची बैठक सिध्द करावयाची असते. पहिल्या दिवशी जेवणानंतर रात्री ९ वाजता झोपून दुसरे दिवशी पहाटे ४वा उठावयाचे असते. येथूनच साधनेस खरी सुरूवात होत असते.शील,समाधी,प्रज्ञा असे तीन मुख्य टप्पे या साधनेत असतात. आपण या १० दिवसात समाधी च्या १ल्या पायरीपर्यंत प्रगती करू शकतो, असे मला वाटते.

अगदी पहिल्या दिवसापासून पुढे रोज ११दिवस पहाटे ४ते ४-३० यावेळात उठून हात,पाय ,तोंड धुवून ध्यानास तयार हॊणे अपेक्षित असते. पहाटे ४.०० वाजता आपल्याला जाग यावी म्हणून,आपल्या खोलीच्या दाराशी स्वयंसेवक साधक येऊन अत्यंत मंजुळ आवाजात घंटी वाजवून साद घालतो, साधकाने लगेच उठून ध्यानासाठी तयार व्हावयाचे असते.

रोजचा दिनक्रम प्रमुख आचार्य प.पू.सत्यनारायण गोयंका यांनी ठरवून दिल्याप्रमाणे आखलेला असतो. साधकाने त्याचे कठोरपणे पालन करणे अपेक्षित असते. प्रत्येक ध्यानाचे वेळी ध्यान कसे करावे ,कसे बसावे,कुठली क्रिया करावी याची माहिती प.पू. गोयंका यांच्या आवाजात क्यासेट किंवा व्हिसीडी च्या द्वारे दिली जात असते. प्रत्येक वेळी “तेरा मंगल—–तेरा मंगल—-तेरा मंगल होय रे——-“ आणि  “ भवतु सब्ब मंगलं—, भवतु सब्ब मंगलं—, भवतू—– सब्ब— मंगलं— “ असा त्रिवार घोष होतो त्यास आपण “ साधू–,साधू—- साधू — “ असा प्रतिसाद देत विनम्र भावाने ध्यानाची सांगता होते. हा दिनक्रम खाली दिल्याप्रमाणे असतो.

पहाटे ४ते४.३० जागरण,पहाटे ४-३० ते ६-३० ध्यान,  ६-३० ते ८ न्याहरी, चहापान, विश्रांती

सकाळी ८ ते ११ ध्यान. ११ ते दुपारी १ विश्रांती, दुपारी १२ पुर्वी भोजन,

दुपारी १ ते ५ ध्यान, ५ ते ६ न्याहरी -फक्त नवीन साधकासाठी, सरबत- फक्त ज्येष्ठ साधकांसाठी,

सायंकाळी ६ते७ ध्यान ,रात्री७ते८.३० प्रवचन, रात्री८.३० ते ९ ध्यान,

रात्री ९.३० पर्यंत ज्याना अडचणी असतील त्यांचॆ शंकासमाधान,इतरांनी रात्री ९ते पहाटे ४ विश्रांती.

याप्रमाणे हा दिनक्रम पाळून साधकास या साधनेचे सर्व लाभ मिळवणे शक्य असते. पहिले दोन दिवस “आनापाना” ध्यान क्रिया शिकवली जाते. या ध्यानाचे सूत्र एका श्लोकाने सांगितले जाते ते असे—

“आतेजाते सांसपर रहे निरंतर ध्यान । कर्मके बंधन टुटे होये परम कल्याण ॥ . ध्यानकक्षाच्या  प्रवेशद्वारा जवळ्च सूचना फलकावर हे सर्व लिहिलेले असते. रोजची कार्यक्रम-पत्रिका तेथे लावलेली असते. “ आनापाना ध्याना मध्ये साधकाने नाक आणि वरचा ओठ येथे होणा-या संवेदनेवर लक्ष केंद्रित करावयाचे असते,मात्र त्या संवदनेप्रति समत्व भाव ठेवावयाचा असतो.हे कसे साधायचे ते प्रवचनातून सांगितले जाते “आनापाना” ध्याना नंतर सायंकाळच्या प्रवचनात आधी,”अधिष्ठानाचे महत्व ” सांगून  “विपश्यना ध्यान” कसे करावयाचे हे शिकवले जाते. त्यात हळूहळू जशी प्रगती होईल तसतसे साधकास मन सूक्ष्म कसे करत जायचे हे शिकवले जाते.प्रत्यक्ष अनुभूतीस येथे खूपच महत्व असते. ८दिवस विपश्यना साधना केल्यावर, मौनाची समाप्ती होते. शेवटच्या दिवशी मैत्री साधनेचे महत्व विशद केले जाते त्यास “मित्त “ असे संबोधले जाते.मौन संपले तरी ध्यानकक्षात मौन पाळावयाचे असते,तसेच हा परीसर सोडण्याचीही अनुमती नसते. या दिवशी आपण जमा केलेल्या मौल्यवान वस्तु परत घेता येतात.इतर व्यवहार पूर्ण करावे लागतात.

१ला दिवस शिबीरास उपस्थित राहून पुढे १० दिवस विपश्यना साधना शिकून १२व्या दिवशी पहाटे ४.३०ते ६.३० ध्यान केल्यावर सकाळी ७ पर्य़ंत न्याहरी करून व खोलीची चावी परत करून आपण अत्यंत प्रसन्न मनाने शिबीराचे आवार सोडू शकतो.

सर्वांचे कल्याण होवो ! सर्वांचे कल्याण होवो!! सर्वांचे कल्याण हो—–वो—-!!!हा मंत्र मनात जपतजपत!!

हा लेख अवश्य वाचा https://savadhan.wordpress.com/2010/02/20/३-विपश्यना-एक-आनंददायी-अन/