Savadhan's Blog


१.निवडक सार्थ-मनाचे श्लोक !

समर्थ रामदासांनी मनाला केलेला बोध-उपदेश हा अत्यंत मोलाचा आहे. अनेकांनी या मनोबोधाचा सखोल अभ्यास करून त्यावर आध्यात्मिक टिपणी केलेली आहे.आजच्या या धकाधकीच्या,चंगळवादी आणि उपभोगावादाच्या जमान्यात या मनोबोधास खूपच महत्व  आहे असे मला वाटते.सगळ्या २०५ श्लोकांचे रोज वाचन.मनन व चिंतन करणे आवश्यक आहे परंतु घाई,गडबड, वेळेचा अभाव अशी कारणे पुढे करून आपण आपल्या मनाची समजूत घालून हळुहळु सगळंच सोडून देत आहोत.त्यामुळे आपण अजाणतेपणे एका महत्वाच्या संस्काराला मुकत आहोत असे मला वाटते. तसे होऊ नये ,निदान त्यातील निवडक श्लोकांचे तरी रोज आपण पठण व मनन करावे या हेतूने आपल्याशी हा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे २०५ श्लोकामधून नेमके काय नि कसे निवडायचे हा प्रश्न मला पडला. सगळेच श्लोक हे सुवर्णासमान !त्यातून जे निवडले तेही सोनेच ना? त्यात  माझं  कर्तृत्व  शून्य ! समर्थांनी जे सांगितलं ते तसेच आपल्यासमोर ठेवण्याची संधी मी घेत आहे.ज्या उणिवा असतील त्या माझ्या हॊत हे जाणकारांनी समजून घ्यावे.
समाजमन नैराश्यग्रस्त होऊ नये,ते सदैव ताजेटवटवीत रहावे याची जाण संताना सदैव होती. अनेक प्रकारचा जीवनोपयोगी असा उपदेश देणारे संत,महंत या भरतभूमीवर अवतरले.संत रामदास हे त्यापैकीच एक होत.संत साहित्याच्या अभ्यासाने मन शांत होते,अवघे प्रश्न मिटून जीवन सुखावह होण्यास मदत होते.आज होत असलेल्या विद्यार्थी,शेतकरी यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय झाला आहे.परंतु समस्त जनांनी,विद्यार्थ्यांनी  रोज १५ मिनिटे वेळ काढून या निवडक मनाच्या श्लोकांचे केवळ वाचन जरी केले तरी त्यांना जीवन आनंदाने जगण्याचा राजमार्ग सापडेल. साडेतीनशे वर्षापुर्वीच्या  मराठी भाषेतील हे साधे सोपे श्लोक, समजायला जरी सोपे वाटत असले तरी त्यांचा भावार्थ येथे मुद्दाम दिला आहे. त्यामुळे त्यांचे आकलन हॊण्यास मदतच हॊईल. जरा प्रयत्न तर करुन पहा?

agnaye swahaa !

Advertisements

२.विपश्यना !!!

खडतर असे ही साधना । कठीण साधना विपश्यना ॥१॥

शील,समाधी,प्रज्ञा या अंगा । तू जाणून घे रे बा साधका ॥२॥

प्रथम शीलाचे ते पालन । ब्रह्मचर्य,अहिंसा नि मौन ॥३॥

कठोर मौन ते दहा दिन ।ध्यान आनापान दोन दिन ॥४॥

येत्या जात्या श्वासावर ध्यान। निरंतर, होतसे आनापान॥५॥

वरच्या ओठी करता ध्यान ।संवेदना सुखदुःखाची जाण ॥६॥

ठेवून समता तू साधका । विपश्यनेचे मर्म हे जाण ॥७॥

आठ दिन होई विपश्यना । सांगता होतसे “मित्त” ध्याना ॥८॥

“विपश्यना” साधना कठीण । तास बारा रोज ध्यानासन ॥९॥

सात तास मिळे निद्रासन । पाच तास विश्राम हे जाण॥१०॥

अशी ही साधना कठीण । स्वतःस विशेषत्वाने तू  जाण ॥११॥

सर्वांचे मग होवो मंगल! । सर्वांचे मग होवो मंगल!! ॥१२॥

सर्वांचे मग होवो मंगल !! । त्रिवार घोष, होई कल्याण ! ॥१३॥

प्रतिक्रियेसाठी शिर्षकावर क्लिक करावे.

आता जे सुचेल ते —

एका समारंभास गेलो होतो. जेवणाचा छान सुग्रास बेत होता.आम्ही सगळेच मस्त मजेत होतो. आनंदात होतो. मध्येच एकानं एक टूम काढली. ए– पंगत बसली की आम्ही लहानपणी  “वदनी कवळ घेता— नाम घ्या —– ”  म्हणायचो, तेव्हढ्यात दुस-याने पुढच्या ओळी म्हणायला सुरुवात केली सुद्धा !—सहज हवन होते —–! अरे मला काय म्हणायचे आहे ते तरी समजून घ्या ! हे पहा, आता असे काहीतरी कि जे  या कार्यक्रमास साजेलसं असेल असं काही तरी म्हणाना राव !! मी म्हटलं ठीक आहे ,ऎका—-. त्या  कार्यक्रमाचं वर्णन करणारा एक श्लोक रचून , एका विशिष्ट चालीत  तो मी गायला, सर्वानाच तो आवडला आणि तेव्हापासून हा श्लोक मी नेहमीच कुठल्या  न  कुठल्या भोजन समारंभात आवर्जुन गात असतो. लोक विचारतात कुणाचा  हा श्लोक आहे, मी सांगतो –याच कार्यक्रमाचा !  छान मजा येते.बघा तुम्ही पण गाऊन ! आवडेल तुम्हाला !!!

ॐ नमो भगवते वासुदेवा या —-।

प्रयासे हा उभारला सारा मेळावा ।

प्रयासे हा साकारला सारा मेळावा ।

काही नसे येथे उणे या य लोकेशा ।

काही नसे येथे उणे या या गणेशा ।

काही नसे येथे उणे याया परमेशा।

शमवा तुम्ही भूक अपुली—-।

शमवा तुम्ही तहान अपुली—।

तृप्त तुम्ही व्हा या या या  आ —–।

ॐ नमो भगवते वासुदेवा या या आ —-॥१॥

प्रतिक्रियेसाठी शिर्षकावर क्लिक करावे.

तारणहार

तारणहार हॆ विश्वाचॆ । मनुजा वाटॆ भजावॆ वाचॆ ॥

करत सॆवा दीनदुबळ्यांची। अमर तॆ झालॆ संत पदासी ॥1

दमन हॆ करती षड्रीपुंचॆ । संहार करी तॆ दुर्जनांचॆ ॥

पालन करती सज्जनांचॆ । तारणहार हॆ विश्वाचॆ ॥2