Savadhan's Blog


मराठीप्रेमींसाठी

मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे अनेक विद्वानांनी कंठशोष करूनही महाराष्ट्रात मराठीभाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्या साठी सलिल कुलकर्णी सारखे दिःग्गज जिवाचे रान उठवत आहेत. कौशल इनामदारासारखे संगीताच्या माध्यमातून मराठी अभिमान गीताद्वारे मराठीचा झेंडा जगभर फडकवत आहेत.माझी मराठी माय-माता सर्वतोमुखी आनंदाने विराजमान होइल.तिची सतत आठवण रहावी म्हणून हे शब्ददान!

मराठी असे शारदा मायमाता IIधृII

तियेची कसे दाखवू मी महत्ता;

शब्दांचेमुळे त्या अक्षरा महंता,

जियेचि असे देववाणीच माता —II१II-मराठी—

प्रयासे लिहावे, विज्ञाने भरावे,

मरावे परी माय स्मरीत जावे,

मराठी लिहावे,मराठी वदावे,

विवेके करावी जगामाजि माता;—II२II-मराठी…..

मराठी लिपी जाण सोपी असे रे,

जराशा प्रयासे पचोनीं पडे रे,

क काठी,व वाटी,ग गोटी लिहीता,

जराशा सरावे प्रसन्न हो माता;–II३II… मराठी….

सदा सर्वदा शुद्ध बोलू मराठी,

प्रयासे सदा शुद्ध लिहू मराठी,

वदे तो मराठी, मराठी लिहीता

मराठी असे आमची मायमाता,II४II.—मराठी —

०४.०१.१०पुणे

Advertisements