Savadhan's Blog


अनंताकडून अनंताकडे–!

अनंताकडून अनंताकडे–!
अनंताकडून अनंताकडे
प्रवास माझा चालू आहे !
विश्वाच्या या अनंतसागरी,
अवतरलो मी या अवनीवरी,
कुठून आलो, कसले प्रयोजन?
कोण मी अन कोण ? हे गुंजन !
केव्हापासून सल हा मानसी
प्रश्न न उलगडे अनंतराशी,
कसला अहम् अन् कुठे तो आत्मा ?
नेणिवे पल्याड वसे अंतरात्मा !
सुक्ष्मात सूक्ष्म,पिंडी ते ब्रह्मांडी,
श्वासात उच्छ्वास, कुडीतकुडी,
विश्वात भरला असे विश्वंभर,
मी कोण,कुठला,कसा–पडला विसर !
अनंताकडून अनंताकडे,
प्रवास माझा चालू आहे !!
दि.१-६-२०००

Advertisements
अनंताकडून अनंताकडे–! वर टिप्पण्या बंद