Savadhan's Blog


महिला आरक्षण विधेयक !

Posted in सामाजिक by savadhan on 07/03/2010
Tags:

महिला आरक्षण विधेयक !
महिला आरक्षण विधेयक एक तपाहून जास्त काळ मंजुरीविना संसदेत रेंगाळत पडलेले आहे. ज्या देशात स्त्रीयांचा पदोपदी उदो उदो होतो. स्त्रीला देवी समजून विविध धार्मिक कार्यक्रमानिमित्त आणि केवळ त्या दिवसापुरतच मर्यादित असा तिला बहूमान दिला जातो.आम्हीच स्त्रीयांचा मान राखतो अशा गप्पा मारण्याची फुशारकी पण करत असतो. “यत्र नार्यस्तु पूज्य न्ते  रमन्ते तत्र देवताः” स्त्रियांची पूजा जेथे होते तेथे देवतांचा वास असतो, त्या तेथेच रमतात असं ज्या देशात म्हंटलं जातं.त्त्याच देशात भारतीय स्त्रीला समान हक्क मिळू नये म्हणून सगळे कसे अगदी विनाअट एकत्र येतात. एकानं तिला हक्क देतो असं जाहीर करायचं, तर दुसर्‍यानं तिला ते हक्क मिळू नयेत म्हणून कंबर कसायची.आम्हीच कसे स्त्रियाचे कैवारी आहोत याची हाकाटी एकाने मारायची तर दुसर्‍याने स्वतःची टिमकी वाजवत आपण कसे तिच्या हक्काची जपणूक करत आहोत म्हणून बोंबा मारायच्या. खरं काय आहे हे सर्वसामान्य जनतेस समजतच नाही.
सज्जन हो जरा विचार करून पहा. अशी हाकाटी मारायची खरं तर काही गरजेचं आहे का? आपल्याला एव्हढा पुळका आहे ना स्त्रियांच्या बद्दल ? तर मग द्याना त्याना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व तुमच्या गटामध्ये! इथं तर कोणी तुम्हाला आडवायला बसलेलं नाही ? प्रत्येक पक्षाने ते जेव्हढ्या जागा लढवतात त्याच्या निम्म्या जागावर स्त्रियांना प्रतिनिधित्व देऊन आपलं पुरोगामित्व सिद्ध करायला काय हरकत आहे ?उगिच कैवारीपणाचा आव कशाला आणायचा? असं जर एखाद्या पक्षाने केलं तर त्याला त्याचं पुरोगामित्व आपोआपच जगजाहिर होईल.त्याला कंठशोष करण्यची आवश्यकताच उरणार नाही. त्याचं बघून इतरांनाही तोच मार्ग चोखाळावा लागला असता. आणी असं हे विधेयक एक तपाहून अधिक काळापर्यंत रेंगाळण्याची पाळी पण आली नसती.
पण हे सारे स्वार्थी असं कधी घडू देतील काय? आता आपलं काम झाले आहे. आता गरज नाही असं महात्मा गांधीनी सांगूनही पक्ष विसर्जन न करणारे हे लोक महिलांना एव्हढ्या सहजासहजी काही हाती लागू देतील हे कसे समजावे? आता फार तर परिस्थितीच्या रेट्यामुळे जरी हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊन ५४२ सदस्यांच्या लोकसभेत मंजूर झाले तरी ते किमान ५०% इतर राज्यांच्या विधान सभेत मंजूर हॊणे आवश्यक असेल. तेव्हा कुठे त्याची अंमलबजावणी खर्‍या अर्थाने करणं शक्य हॊईल.म्हणजे महिलांना “दिल्ली बहोत दूर है” असेच एकूण चित्र आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महिलांना आरक्षण ३३% का? याला आरक्षण कां म्हणायचे ? अहो संख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व कां मिळू नये ? पुरूषांच्या लोकसंख्येच्या ८०% लोकसंख्या महिलांची आहे असं समजलं तर २१७ महिलांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे नाही कां? मी काही या विषयातील तज्ञ नाही.कृपया यावर जाणकार प्रकाश टाकतील काय?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: