Savadhan's Blog


मृत्यूची चाहूल !

मृत्यूच्या संदर्भात मानवी जीवनात ज्या काही अतर्क्य घटना घडतात याच्यामागे काही शास्त्रीय सत्य आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न परामानसशास्त्रज्ञ करत आहेत. फ्राइडने आपल्या मानसशास्त्रात मृत्यूच्या आंतरिक जाणिवेची-प्रेरणेची चर्चा केली आहे.फ्राइडचा शिष्य कार्ल युंगने स्वप्नांचा सूक्ष्म शास्त्रीय अभ्यास केला. त्याच्या मते, स्वप्नातून मानवाच्या मृत्यूविषयक भूमिकेचे दर्शन होते तसेच स्वप्नामधील मानवाच्या जीवनातील प्राचीन काळा- पासून दृढमूल झालेल्या प्रतिमांचे आणि प्रतीकांचे दर्शन घडते.(ref:memories dreams and reflections p.238).मृत्यूची आगाऊ सूचना देणारी काही स्वप्ने युंगने आपल्या आत्मवृत्तात दिली आहेत. असाच प्रकार खाली नमूद केलेल्या घटनेत घडला असेल काय? हा अतींद्रिय अनुभव तर नव्हे?[संदर्भ-मरणात खरोखर जग जगते,बाळ सामंत]
पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये १४ फेब्रु २०१० रोजी झालेल्या स्फोटात अनेकजण जखमी झाले तर काहीजण मृत्यूमुखी पडले.त्यावर भाष्य करताना योगायोगाच्या गोष्टीचा येथे काही संबंध असेल का? असा प्रश्न उपस्थित झाला. मृतापैकी एक आनिंदयी नावाची एकोणीस वर्षाची फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणारी मुलगी, जी या स्फोटात मरण पावली, तिला आधी अशी काही दुर्घटना होणार आहे याची पूर्वसूचना किंवा काही संकेत मिळाले असतील की हा निव्वळ योगायोग असावा असे तिच्या मित्र मैत्रिणींना वाटतेय ! त्याची कारणे ही तशीच विचार करायला लावणारी अशीच आहेत.
काव्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने इंग्रज कवी ब्राऊनिंगची एक कविता वर्गात शिकवली जात असता, या विशितल्या आनिंदयीने “मृत्युची व्याख्या काय ?” असा प्रश्न आपल्या प्राध्यापिकेला नुकताच विचारला होता.या वयात तिनं मृत्यूबाबत एव्हढं चौकस कां असावं ?
दुसरी गोष्ट म्हणजे तिला फोटोग्राफीची आवड हॊती. फिल्म इन्स्टिट्यूट्मधल्या आपल्या मित्रांकडे ती त्यानिमित्ताने जात असे. तेथे एका मित्राच्या विनंतीस मान देऊन तिने एका छोट्या फ़िल्ममधल्या एका दृष्यात नुकताच भाग घेतला होता. त्या दृष्यात एका रेस्टारंटमधल्या टेबलाभोवती ती तिच्या मित्रमैत्रणीसह गप्पा मारत बसली असता समोरच्या दारातून एक सामान्य ग्राहकासारखा दिसणारा दहशतवादी हातात काळी बॅग घेऊन येत असल्याचे दाखवलेले आहे. आणि जर्मन बेकरीमध्ये झालेल्या स्फोटात नेमकं असंच घडल्याचे दिसून आलेय. हा काय प्रकार आहे ? हा योगायोग आहे किंवा काय ? हाच तो प्रश्न ! शास्त्र काय सांगते?
मृत्यूची चाहूल, त्याची जाणिव इतर प्राण्यांना पण होत असते काय? तर याचे उत्तर होय असे द्यावे लागते. सर्वसाधारणपणे प्राणी आपल्या स्वकीयांच्या मृत्यूबाबत बेफिकीर असतात पण त्यांना मृत्यूचे भान मात्र निश्चितच असते असे दिसून येते. माणूस हा सुद्धा एक प्राणीच आहे ,पण स्वकीयांच्या मृत्यूने तो अधिक शोकाकुल होतो, भावविवश होतो. जिवो जिवस्य जिवनम ! या न्यायाने मृत्यूची चाहूल प्राण्यांना अतिशय जलद गतिने होते. एखाद्या ठिकाणी मरणपंथास लागलेल्या प्राण्याची चाहूल गिधाडांना कित्येक तास अगोदर लागते. हे कसे ? प्रत्यक्ष खून किंवा मृत्यू पाहतांना माणसाचा जसा थरकांप होतो तसा वनस्पतींचाही भयाने थरकांप होतो. वनस्पतीं माणसासारख्याच संवेदनशील असतात असे जगदीशचंद्र बसू यानी प्रयोगाने सिद्ध केले आहे.[संदर्भ-मरणात खरोखर जग जगते,बाळ सामंत]
त्सुनामीच्या प्रलयाची जाणीव तेथील आदिवासी,पशू,पक्षी याना अगोदरच आली होती त्यामुळे ते सर्व समुद्र किनार्‍यापासून दूर उंचावर जाऊन थांबले. जे दूर गेले ते सगळे वाचले. आतल्या आवाजाची ज्यानी दखल घेतली ते बचावले,असे म्हंटले तर ते वावगे ठरू नये. थोडक्यात मृत्यू-संकटाची चाहूल,जा्णीव सर्वच प्राणिमात्रांना होत असते पण ते सदैव या संकेताप्रती सजग असतील तर !
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: