Savadhan's Blog


१.निवडक सार्थ-मनाचे श्लोक !

समर्थ रामदासांनी मनाला केलेला बोध-उपदेश हा अत्यंत मोलाचा आहे. अनेकांनी या मनोबोधाचा सखोल अभ्यास करून त्यावर आध्यात्मिक टिपणी केलेली आहे.आजच्या या धकाधकीच्या,चंगळवादी आणि उपभोगावादाच्या जमान्यात या मनोबोधास खूपच महत्व  आहे असे मला वाटते.सगळ्या २०५ श्लोकांचे रोज वाचन.मनन व चिंतन करणे आवश्यक आहे परंतु घाई,गडबड, वेळेचा अभाव अशी कारणे पुढे करून आपण आपल्या मनाची समजूत घालून हळुहळु सगळंच सोडून देत आहोत.त्यामुळे आपण अजाणतेपणे एका महत्वाच्या संस्काराला मुकत आहोत असे मला वाटते. तसे होऊ नये ,निदान त्यातील निवडक श्लोकांचे तरी रोज आपण पठण व मनन करावे या हेतूने आपल्याशी हा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे २०५ श्लोकामधून नेमके काय नि कसे निवडायचे हा प्रश्न मला पडला. सगळेच श्लोक हे सुवर्णासमान !त्यातून जे निवडले तेही सोनेच ना? त्यात  माझं  कर्तृत्व  शून्य ! समर्थांनी जे सांगितलं ते तसेच आपल्यासमोर ठेवण्याची संधी मी घेत आहे.ज्या उणिवा असतील त्या माझ्या हॊत हे जाणकारांनी समजून घ्यावे.
समाजमन नैराश्यग्रस्त होऊ नये,ते सदैव ताजेटवटवीत रहावे याची जाण संताना सदैव होती. अनेक प्रकारचा जीवनोपयोगी असा उपदेश देणारे संत,महंत या भरतभूमीवर अवतरले.संत रामदास हे त्यापैकीच एक होत.संत साहित्याच्या अभ्यासाने मन शांत होते,अवघे प्रश्न मिटून जीवन सुखावह होण्यास मदत होते.आज होत असलेल्या विद्यार्थी,शेतकरी यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय झाला आहे.परंतु समस्त जनांनी,विद्यार्थ्यांनी  रोज १५ मिनिटे वेळ काढून या निवडक मनाच्या श्लोकांचे केवळ वाचन जरी केले तरी त्यांना जीवन आनंदाने जगण्याचा राजमार्ग सापडेल. साडेतीनशे वर्षापुर्वीच्या  मराठी भाषेतील हे साधे सोपे श्लोक, समजायला जरी सोपे वाटत असले तरी त्यांचा भावार्थ येथे मुद्दाम दिला आहे. त्यामुळे त्यांचे आकलन हॊण्यास मदतच हॊईल. जरा प्रयत्न तर करुन पहा?

agnaye swahaa !

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: